गुडे-शिवोलीत पाच लाखांचे अंमलीपदार्थ जप्‍त

पोलिस पथकाने रात्री सव्वानऊच्या सुमारास गुडे-शिवोली येथे भाडेपट्टीच्या घरात राहत असलेला युवकाला घेतले ताब्यात
Five lakh medicine seized in Siolim
Five lakh medicine seized in SiolimDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गुडे-शिवोली (Siolim) येथे एका भाडेपट्टीच्‍या घरावर छापा टाकून अंमलीपदार्थविरोधी कक्षाच्या (NNC) पोलिस (Goa NCB) पथकाने 536 ग्रॅम हशिश हे अंमलीपदार्थ जप्‍त केले. तसेच सत्यनारायण मनुकोंडा (27, मूळ आंध्रप्रदेश) याला अटक केली. या अंमलीपदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 5 लाख 36 हजार रुपये किंमत आहे. ही कारवाई बुधवारी रात्री उशिरा करण्यात आली. संशयिताला न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे.

Five lakh medicine seized in Siolim
संशयितावर हल्ल्याप्रकरणी गोव्यातील उपनिरीक्षकावर नोंदवला गुन्हा

कक्षाचे निरीक्षक सूरज हळर्णकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अंमलीपदार्थ व्यवहाराची माहिती मिळाली होती. त्‍या आधारे पोलिस पथकाने रात्री सव्वानऊच्या सुमारास गुडे-शिवोली येथे भाडेपट्टीच्या घरात राहत असलेला युवक सत्‍यनारायण याला त्याला ताब्यात घेऊन त्‍याच्‍या खोलीची झडती घेतली असता कपड्यांमध्ये लपवून ठेवलेले हशिश सापडले. त्याने तो अंमलीपदार्थ दलालाकडून विक्रीसाठी घेतला होता अशी माहिती दिली. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक रोहन मडगावकर करत आहेत.

Five lakh medicine seized in Siolim
मोरजीत साडेतीन लाखांचे अमलीपदार्थ जप्त

दरम्‍यान, नुकताच पोलिस महासंचालकपदाचा ताबा घेतलेल्या इंद्रदेव शुक्ला यांनी राज्यात अंमलीपदार्थ व्यवहारात गुंतलेल्यांविरोधात कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. गोवा राज्य ‘ड्रग्‍समुक्त’ करण्याला प्राधान्य राहणार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे पोलिस पथक सक्रिय झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Government Employee Relief
Goa Weather Forecast IMD
Baina fish market vendors protest Goa
Goa CM assures solution to Mapusa traders problems
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com