Goa Fishing: राज्यात मासेमारी मंदगतीनेच; हवामान, सँड बार, कामगारांच्या समस्येचा परिणाम

हंगाम सुरू, पण ट्रॉलर्स धक्क्यांवरच
मासेमारी
मासेमारी Dainik Gomantak

पणजी: मासेमारी हंगामाला 1 ऑगस्टपासून अधिकृतरीत्या सुरुवात झाली असली, तरी सध्या मासेमारी मंद गतीने सुरू आहे. सुट्टीवर गेलेले बहुतांश कामगार परत आले नसल्याने मोठे ट्रॉलर्स समुद्रात गेले नसल्याचे राज्‍यभरातील मच्छीमार धक्क्यावरून दिसून येत आहे. हवामान, सँड बारच्या समस्येमुळेही ट्रॉलर्स गेले नाही. तर, काही ट्रॉलर्स हे नारळी पौर्णिमेनंतर मासेमारीला सुरुवात करतील.

(Fishing in the state is slow; Result of weather, sand bar, labor issue)

मासेमारी
Goa Politics: ‘त्या’ मंत्र्याची हकालपट्टी करा : गिरीश चोडणकर

राज्‍यात सहा ठिकाणी मच्छीमार धक्के असून, यातील चार वास्‍को, कुठ्ठाळी, कुटबण आणि तळपण दक्षिण गोव्यात आहे. तर, दोन मालीम आणि शापोरा उत्तरेत आहे. दक्षिण गोव्‍यातील मच्छीमारांकडून अनेक तक्रारी केल्या जात आहे. त्यात सँड बारची मोठी समस्या असल्याने ट्रॉलर्सना नदीतून समुद्रात प्रवेश करताना अवघड होत असल्याची तक्रारी कुटबण येथील मच्छीमारांनी केली आहे. तर, बहुतांश मोठे आणि लहान ट्रॉलर्स हे सप्टेंबरमध्ये सुरू होतात.

यंदा मासेमारीसाठी जाणाऱ्या ट्रॉलर्सना पासेस दिले जाईल. खात्याची प्रक्रिया असून एलईडी मासेमारी होणार नाही याची काळजी घेतली जाईल. तसेच, ट्रॉलर्स हे पासेस घेऊनच मासेमारीला गेले आहे, याची देखील तपासणी केली जाणार आहे. याची खात्‍याचे अधिकारी आणि किनारी पोलीस विभाग यांना देण्यात आली आहे.

-नीळकंठ हळर्णकर, मच्छीमार मंत्री

सरकारने मासेमारी बंदी ही लवकरच संपुष्टात आणणे आवश्‍यक आहे, कारण सोलार कोळंबी समुद्रात त्याच वेळी पकडण्याची संधी निर्माण होते. परंतु, हा काळ बंदीच्या वेळी येत असल्याने मच्छीमारांना ती मिळत नाही. त्यासाठी बंदीचा काळ कमी करण्याची आवश्‍यकता आहे.

-जुझे फिलिप डिसोझा, अध्यक्ष, अखिल गोवा बोट मालक संघटन

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com