जीर्णावस्थेतील जेटी पाण्यात कोसळण्यापूर्वी सरकारने नवीन जेटी बांधून द्यावी

फिलीप डिसोझा : सरकारने नवीन जेटी बांधून देण्याची मच्छिमार संघटनेची मागणी
Jetty
Jetty Dainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: खारीवाडा-वास्को येथील मच्छीमारी जेटी जीर्णावस्थेत असून, ती पाण्यात कोसळण्यापूर्वी सरकारने नवीन जेटी बांधून द्यावी, अशी मागणी अखिल गोवा मच्छीमारी संघटनेचे अध्यक्ष जुझे फिलीप डिसोझा यांनी सरकारदरबारी केली आहे.

(Fishermen's Association demands construction of new jetty before dilapidated jetty collapses)

Jetty
धक्कादायक; नयबाग येथे आढळला लचके तोडलेल्या अवस्थेत मृतदेह!

वास्कोतील खारीवाडा जेटी ही पोर्तुगीजकालीन आहे. या जेटीवर 300 हून अधिक मच्छीमारी व्यावसायिक आपले ट्रॉलर्स लावतात. जेटी लहान असल्याने मोजकेच ट्रॉलर्स या जेटीवर लागतात. बाकीचे ट्रॉलर्स खोल समुद्रात नांगरून ठेवावे लागतात. ही जेटी सध्या जीर्णावस्थेत असून, ती केव्हाही जलसमाधी घेण्याची शक्यता आहे.

त्यामुळे मच्छीमारी व्यावसायिकांनी या जेटीविषयी मच्छीमारी खात्याकडे तसेच सरकारदरबारी नवीन जेटी बांधण्याविषयी प्रस्ताव मांडला. परंतु आजपर्यंत हे सर्व प्रस्ताव कागदावरच राहिलेले आहे.

याविषयी पत्रकारांशी बोलताना डिसोझा यांनी खारीवाडा जेटीकडे सरकारने दुर्लक्ष केले असून, प्रस्तावाला केराची टोपली दाखवली आहे. पणजी येथील मच्छीमार जेटीसाठी सरकारने करोडो रुपये खर्च केले आहेत. तसेच बेतूल येथे साधनसुविधायुक्त जेटी बांधून दिलेली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com