Goa Fishing: गोव्यात मासेमारीसाठी एलईडीचा वापर सुरूच; बोटीतल्या जनरेटरला मच्छिमार खात्याचं 'बॅकअप'?

Goa LED Fishing: सदर निवेदन रापणकार, छोटी बोटधारक मच्छिमारांच्यावतीने मच्छिमार खात्याच्या संचालकांना सादर करण्यात आले
Goa LED Fishing: सदर निवेदन रापणकार, छोटी बोटधारक मच्छिमारांच्यावतीने मच्छिमार खात्याच्या संचालकांना सादर करण्यात आले
Goa Fishermen RaponkarsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: मासेमारीसाठी समुद्रात जाणाऱ्या काही बोटधारकांकडून एलईडीचा वापर होत आहे. हा एलईडीचा वापर बंद करण्याची मागणी करणारे निवेदन रापणकार, छोटी बोटधारक मच्छिमारांच्यावतीने मच्छिमार खात्याच्या संचालकांना सादर करण्यात आले.

निवेदन सादर केल्यानंतर पत्रकारांना माहिती देताना ऑलेन्सियो सिमोन्स म्हणाले, आम्ही एलईडीचा जो वापर होत आहे, तो बंद करण्याची प्रामुख्याने मागणी केली आहे. बोटीतून ज्याप्रकारे १५० केव्हीचा जनरेटर नेले जात आहेत, त्यावरून त्याचा एलईडीसाठीच वापर होत आहे, हे स्पष्ट आहे.

संचालक नार्वेला गेल्या होत्या, कशासाठी त्या तिथे गेल्या, त्या देशात मासळी बंद आहे. तेथे ज्याप्रमाणे मासळीच्या जाती टिकवण्यासाठी बंदी घातली आहे, तशी बंदी गोव्यात घालणार आहात काय? असा सवाल त्यांनी केला. देशातील व गोव्यातील मच्छिमार व्यवसाय संपविण्यासाठी तुम्ही नॉर्वेचा दौरा केल्याचा आरोप सिमोन्स यांनी केला.

Goa LED Fishing: सदर निवेदन रापणकार, छोटी बोटधारक मच्छिमारांच्यावतीने मच्छिमार खात्याच्या संचालकांना सादर करण्यात आले
Fishing In Goa: ‘एलईडी’ मासेमारीवर बंदी घाला!

गोवा शिपयार्डने केलेल्या तपासणीत १६ बोटींवर एलईडीचा वापर होत असल्याचे आढळले होते. सध्याच्या संचालकांनीच एलईडी वापर नको म्हणून कायदा पास केला होता, आता त्याच येथील रापणकरांना संपविण्यास पुढे सरलेल्या आहेत, असेही ते म्हणाले.

एलईडी वापराविषयीचे प्रकरण उच्च न्यायालयात आहे. त्यामुळे त्यावर बोलणे उचित ठरणार नाही.

डॉ. शमिला मोंतेरो, संचालक.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Atal Asra Scheme Goa Latest
Goa Transport Department Action
Goa town planning rule changes
Nerul fisherman death
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com