Fish Market Goa
Fish Market GoaDainik Gomantak

गोव्यात मासळीचे दर वाढले

बांगड्यांच्या दरात देखील गेल्या आठवड्यापासून वाढ झाली
Published on

पणजी: गोव्यातील बहुतांशी नागरिकांना मत्सहार प्रिय आहे. ताटात मासळी नसेल तर पोटात दोन घास कमीच जातात. पण, सध्या मासळीचे दर वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री बसत आहे. बांगडे, तारली, समुद्री खेकडे, कर्ली, इसवण, पापलेट, कोळंबी अशा विविध प्रकारची मासळी मुबलक प्रमाणात बाजारात उपलब्धी होती. मासळी विक्रेते प्रती वाटा दराने तर काही प्रती किलो दराने मासळी विकत होते.

पापलेट, इसवण, कोळंबी, माणकी या मासळींना मागणी अधिक असते. मात्र, या मासळीचे दर सर्वासामान्य नागरिकांच्या खिशाला परवडणारे नाहीत. पापलेट 1000 (हजार) रुपये प्रती किलो तर इसवण 850 रूपये कोळंबी आकारानुसार 300 ते 600 रूपये प्रती किलो दराने विकली जात आहे. बांगड्यांच्या दरात देखील गेल्या आठवड्यापासून वाढ झाली आहे. 200 रुपये प्रती किलो दराने मिळणारा बांगडा आता 250 ते 300 रूपये (आकारप्रमाणे) प्रती किलो दराने विकला जातोय. गरीबाची मासळी म्हणून ओळखली जाणारी तारली देखील 200 रुपये प्रती किलो दराने विकली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com