Fish Price Hike in Goa: अवकाळी पावसाचा मासेमारीला फटका; मासळीचे भाव भिडले गगनाला

स्थानिक बाजारपेठेत मासळीच्या किमती वाढल्या आहेत.
Fish Price Hike in Goa | Fish Market
Fish Price Hike in Goa | Fish Market Dainik Gomantak

संपूर्ण देशभरात सध्या अवकाळी पाऊस पडत आहे. गेल्या काही दिवसांपासून गोव्यातही पावसाने आपली हजेरी लावली आहे. राज्यातील काही भागांत पाऊस आणि वीजांचा गडगडाट होत असल्याने राज्याच्या किनारपट्टीवरील मासेमारीवर याचा परिणाम झाला असून त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत मासळीच्या किमती वाढल्या आहेत.

Fish Price Hike in Goa | Fish Market
Sanquelim-Ponda Municipal Council Election 2023: फोंडा-साखळीमध्ये 16 रोजी नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष निवड

मासे विक्रेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यापर्यंत बाजारात मुबलक असलेल्या कोळंबीच्या अनेक जाती पावसामुळे कमी झाल्या आहेत. ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी स्थानिक विक्रेत्यांना मत्स्य फार्म आणि हॅचरीमधून कोळंबीचे उत्पादन घ्यावे लागत आहे.

एक विक्रेता म्हणाला की, उन्हाळा कोळंबीच्या विक्रीसाठी योग्य असतो. मात्र, एकंदरीत वातावरणामुळे समुद्रातील परिस्थिती पाहता मच्छीमार बाजारात कमी प्रमाणात मासेमारी करत आहेत. त्याचा परिणाम विक्रीवर होत आहे. चांगल्या बाजारपेठेची अपेक्षा करण्यासाठी आम्हांला वातावरण निवळण्याची वाट पहावी लागेल.

गेल्या आठवड्यापर्यंत 200 रुपये किलोने मिळणारे मासे आता 600 रुपये किलोने विकले जात आहेत. चोणक सध्या 600 रुपये किलोने विकले जात आहेत तर बांगडा 200 रुपये किलोने विकला जात आहे. सध्या फक्त 150 रुपये किलोने मिळणारा पांढरा खेकडा आणि 200 रुपये किलोने जाणारा लेप्पो सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहे.

दरम्यान, मासेमारी बंदी 1 जून रोजी लागू होणार असल्याने, आमच्याकडे मासेमारीचे काहीच दिवस उरले आहेत. त्यामुळे अवकाळी पावसामुळे आमच्या व्यवसायात अडथळे येत असल्याचे मत मासेमारांनी व्यक्त केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com