डिचोली: चतुर्थीनंतर आता मासळी मार्केटात गजबज दिसून येत असून, श्रावणापासून एक महिन्यांहून अधिक काळ ‘शिवराक’ राहिलेल्या मत्स्यखवय्यांची पावले आता मासळीसाठी मार्केटाच्या दिशेने वळू लागली आहेत. चतुर्थीनंतर आज (मंगळवारी) डिचोलीसह विविध ठिकाणी मासळी मार्केटात गजबज दिसून येत होता. रविवारी पाच दिवसांच्या गणपतींचे विसर्जन केल्यानंतर सोमवार असल्याने कालपर्यंत मासळी मार्केटात वर्दळ कमी दिसून येत होती. मात्र आज मासळी मार्केटात वर्दळ वाढली होती.
(Bicholim Fish Market)
सुरमई वगळता आज डिचोलीत अन्य प्रकारची मासळी मुबलक प्रमाणात उपलब्ध होती. मात्र मासळी महागलेली होती. तरीदेखील मासळीला मागणी होती. मत्स्यखवय्ये मासळी खरेदी करताना दिसून येत होते. डिचोलीसह कारापूर-तिस्क येथील मासळी मार्केटात सकाळी गर्दी दिसून येत होती.
मासे महागले
एक महिन्याहून अधिक काळ मासळी मार्केटात पाय न ठेवलेल्या मत्स्यखवय्यांना मात्र आज मासळी बरीच महाग असल्याचा अनुभव आला. त्यातल्या त्यात सुरमईचे दर ऐकताच अनेकांच्या कपाळाला आट्या पडत होत्या. आज बाजारात सुरमई 700 ते 800 रुपये किलो अशा दराने विकण्यात येत होती. कोळंबी आकाराप्रमाणे 400 ते 600 रुपये किलो अशी विकण्यात येत होती. बांगडे, समुद्रातील खेकडे 300 रुपये प्रति किलो असे दर होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.