Lighthouse Festival: भारतातील पहिला दीपगृह महोत्सव; केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते उद्घाटन

आग्वाद किल्ल्यावर महोत्सवाचे आयोजन
first Indian Lighthouse Festival at Aguada Fort Goa
first Indian Lighthouse Festival at Aguada Fort GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Indian Lighthouse Festival held at Fort Aguada: भारतातील पहिल्या दीपगृह महोत्सवाचे शनिवारी आग्वाद किल्ल्यावर उद्घाटन करण्यात आले.  केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग आणि आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

यावेळी बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग आणि पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, कळंगुटचे आमदार मायकल लोबो उपस्थित होते. पर्यटक आणि स्थानिकांना दीपगृहाकडे आकर्षित करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

first Indian Lighthouse Festival at Aguada Fort Goa
Dabolim Airport: दाबोळी विमानतळावरुन वॉन्टेड आरोपी फरार; दोन पोलिस कॉन्स्टेबल निलंबित

"गोवा हा देशाच्या शक्तीचा आधार आहे. गोव्याला पर्यटनाचा वारसा लाभला आहे. गोव्याला देशातून तसेच जगभरातून पर्यटक भेट देतात याचा मला गर्व वाटतो. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास वेगाने सुरु आहे."

"75 ऐतिहासिक दीपगृहांना आधुनिक बनवून पर्यटनाचे आकर्षण केंद्र तयार करणार आहोत" असे मंत्री सर्बानंद सोनोवाल म्हणाले.

यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, "पर्यटन उद्योगासाठी दीपगृह महोत्सव ही एक मोठी उपलब्धी आहे. सध्या आग्वाद किल्ल्याला दररोज 15 हजार पर्यटक भेट देतात, ASI ने तिकीट क्षमता 20 हजारांपर्यंत वाढवावी" अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

हा लाइटहाऊस फेस्टिव्हल 23-25 ​​सप्टेंबर दरम्यान आग्वाद किल्ला, गोवा येथे आयोजित करण्यात आला आहे. या फेस्टिव्हलमध्ये स्थानिक कलाकारांच्या उपस्थित यावेळी कार्निव्हल शैलीतील नृत्य, फूड स्टॉल, मैफिली आणि इतर उपक्रम सादर केले जाणार आहेत. तसेच हा तीन दिवसांचा उत्सव देशातील सर्व दीपगृहांवर साजरा केला जाणार आहे

first Indian Lighthouse Festival at Aguada Fort Goa
Goa Politics: प्रस्थापितांचे धाबे दणाणले; सुरक्षित मतदारसंघांचा शोध सुरू

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com