Charter Flight In Goa रशियामधून पहिले चार्टर विमान पर्यटकांना घेऊन आज गोव्यात दाखल...

दाबोळी विमानतळावर पारंपारीक पद्धतीने पर्यटकांचे जोरदार स्वागत करण्यात आले व त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
Charter Flight In Goa
Charter Flight In GoaDainik Gomantak

वास्को: रशियामधून पहिले चार्टर विमान 328 पर्यटकांना घेऊन आज पहाटे 5 वाजता दाखल झाले. दाबोळी विमानतळावर पारंपारीक पद्धतीने पर्यटकांचे जोरदार स्वागत करण्यात आले व त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

(first charter plane from Russia carrying tourists arrived in Goa today)

Charter Flight In Goa
Mormugao पालिकेचा कारवाईचा धडाका सुरुच; 61 बेवारस वाहने उचलली

प्रत्येक पर्यटन हंगामात रशियामधून मोठ्या प्रमाणात पर्यटक गोव्यात दाखल होतात. यंदा मात्र मोदी सरकारने ब्रिटीश पारपत्रधारकांसाठीच्या व्हीसा नियमांत बदल घडवून आणल्याने गोव्याच्या पर्यटन हंगामावर त्यांचे गंभीर आणि विपरीत परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे.

पारपत्रधारकांना विनाविलंब व्हीसा मिळण्यास अडचणी निर्माण झाल्याने त्यांना गोव्यात घेऊन येणारी चार्टर्ड विमान रद्द करण्याची पाळी विमान कंपन्यावर आली आहे. तसेच राशियन पर्यटकांना घेऊन येणार असलेल्या अझुर एअरलाईन्सने देखील आपली चार्टर्ड विमाने रद्द केली होती. अझुर एअरलाईन्स कंपनीने 13 चार्टर्ड विमानासाठीचे बुकींग केले होते. ही विमाने ऑक्टोबर महिन्यात गोव्यात येणार होती. मात्र त्यानीं आपले बुकींग रद्द केले होते.

दरम्यान आज पहाटे ५ वाजता राशियामधुन अझुर एअरलाईन्सचे पहिले चार्टर्ड विमान ३२८ पर्यटकांना घेऊन गोव्यात दाबोळी विमानतळावर दाखल झाले.

Charter Flight In Goa
Goa Petrol Diesel Price: गोव्यातील पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर; जाणून घ्या एका क्लिकवर

या विमानातून उत्तरलेल्या पाहुण्यांचे गुलाबपुष्प देऊन तसेच खास पारंपारिक धुन वाजवत स्वागत करण्यात आले. नंतर पाहुण्यांनी पर्यटक बसेस तसेच टॅक्सीत बसून कूच केली.

कोरोना काळात गृह मंत्रालयाने विविध देशांतील ई-व्हिसा निलंबित केले होते. त्यामध्ये संयुक्त राष्ट्रसंघाचाही (युके) समावेश होता. तो आहे तसाच आहे. 'युके' व रशियामधून मधून मोठ्या प्रमाणात पर्यटक गोव्यात येतात.

सध्या पर्यटन हंगाम सुरू झाल्याने या नियमाचा पर्यटकांना त्रास सहन करावा लागत आहे. सध्याची व्हीसा प्रणाली अत्यंत किचकट आणि वेळकाढू आहे. त्यामुळे अनेक पर्यटकांनी गोव्यात येणे रद्द केले आहे. याचा परिणाम म्हणून युकेचे चार पैकी एकच चार्टर विमान गोव्यात आतापर्यंत दाखल होऊ शकले.तर आज पहाटे 5 वाजता राशियामधुन अझुर एअरलाईन्सचे पहिले चार्टर्ड विमान 328 पर्यटकांना घेऊन गोव्यात दाबोळी विमानतळावर दाखल झाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com