Firecracker Ban: फटाके उडवताय? सावधान! आतषबाजीवर पूर्ण बंदी, ख्रिसमस-नवीन वर्षाचा उत्साह थंड

Goa Fireworks ban: जिल्हा प्रशासनाने फटाक्यांवर पूर्ण बंदी घालण्याचा घेतलेला निर्णय विवाह आयोजकांसाठी आणि कुटुंबांसाठी निराशाजनक ठरण्याची शक्यता आहे
fireworks prohibition
fireworks prohibitionDainik Gomantak
Published on
Updated on

Fireworks banned during Christmas: हडफडे येथील नाईट क्लबमधील भीषण अग्नितांडवानंतर जिल्हा प्रशासनाने फटाक्यांवर पूर्ण बंदी घालण्याचा घेतलेला निर्णय गोव्यातील अनेक विवाह आयोजकांसाठी आणि कुटुंबांसाठी निराशाजनक ठरण्याची शक्यता आहे. या व्यापक निर्बंधांचा आगामी ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनवर कसा परिणाम होतो, याबद्दल चिंता व्यक्त केली जातेय.

विवाह सोहळ्यांमध्ये मोठा हिरमोड

ही बंदी खासगी आणि सार्वजनिक अशा दोन्ही कार्यक्रमांना लागू आहे. यामुळे खुल्या सभागृहांमध्ये आणि बँक्वेट हॉलमध्ये होणाऱ्या अनेक विवाह समारंभांवर परिणाम झाला, जिथे फटाक्यांची आतषबाजी पारंपरिकरित्या महत्त्वाची असते.

fireworks prohibition
Goa News: मालिन जेटीजवळ भीषण अपघात; रस्त्याच्या कडेला झोपलेल्या 50-55 वर्षांच्या व्यक्तीला बसने चिरडले, मृत्यू

मुरगाव येथील एका रहिवाशाने सांगितले की, “आम्ही पुढील आठवड्यात आमच्या मुलीच्या स्वागत समारंभासाठी फटाक्यांची आतषबाजी बुक केली होती, परंतु बंदीमुळे ती रद्द करावी लागली. फटाक्यांची आतषबाजी हा संध्याकाळचा मुख्य आकर्षण बिंदू होता, त्यामुळे खूप निराशा झाली आहे.”

इव्हेंट प्लॅनर्स आणि फटाक्यांच्या विक्रेत्यांनी बंदी लागू झाल्यापासून ऑर्डरमध्ये मोठी घट नोंदवली आहे. फटाक्यांचे पुरवठादार म्हणाला, “कायदेशीर गुंतागुंत टाळण्यासाठी बहुतेक ग्राहकांनी फटाक्यांची मागणी पूर्णपणे थांबवली आहे. विशेषतः लग्नाच्या सिझनमध्ये व्यवसायाला मोठा फटका बसला आहे.”

सणासुदीच्या उत्साहावर चिंतेचे सावट

हा आदेश हडफडे घटनेनंतर सार्वजनिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी जारी करण्यात आला असला तरी, अनेकजण आता त्याचा सणासुदीच्या उत्साहावर होणाऱ्या परिणामाबद्दल चिंतेत आहेत. गोव्यात ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये, विशेषत: बीचसाइड पार्ट्यांमध्ये, हॉटेल्समध्ये आणि खासगी समारंभांमध्ये, फटाके हा एक महत्त्वाचा भाग असतो.

काही स्थानिक नागरिकांनी या निर्बंधांबद्दल चिंता व्यक्त केली. ते म्हणालेत, "सुरक्षितता महत्त्वाची आहे, पण सण आणि उत्सव आपल्या संस्कृतीचा भाग आहेत. पूर्ण बंदी घालण्याऐवजी नियंत्रित परिस्थितीत फटाक्यांना परवानगी देण्यासाठी काहीतरी मार्ग हवा होता."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com