
मडगाव : खारेबांद येथील ‘दाऊद चाळ’ या इमारतीच्या तिसऱ्या मजल्याच्या छपराला आग लागण्याची घटना बुधवारी (ता.९) दुपारी २.४५ वा.च्या सुमारास घडली. सुदैवाने या मजल्यावर कुणीही राहत नसल्याने मोठी दुर्घटना टळली. या इमारतीच्या अन्य मजल्यावर लोक राहात होते. आगीचा धूर पसरल्यानंतर या रहिवाशांमध्ये एकच घबराट पसरली.
भीतीने लोक घराच्या बाहेर पडले. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक संशय मडगाव अग्निशामक दलाने व्यक्त केला आहे. यासंबंधी पुढील तपास सुरू असल्याची माहिती दलाचे अधिकारी गिल सोझा यांनी दिली.
आग विझविण्यासाठी मडगाव अग्निशामक दलाचे दोन तर कुंकळ्ळी व वेर्णा येथून एक-एक बंब मागविण्यात आले. ज्या भागात ही इमारत आहे तो भाग चिंचोळा असल्याने येथून वाट काढणे दलाच्या बंबांनाही मुश्कील होत होते.
त्यामुळे आग विझविण्यासाठीही विलंब लागला. आगीची घटना घडल्यानंतर योगीराज कामत, नगरसेवक दीपाली सावळ यांनीही घटनास्थळी धाव घेतली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.