मोपा विमानतळावर अग्नितांडव; 5 ट्रक जळून खाक

लाखोंचे नुकसान : कामगारांमध्‍ये गोंधळ; अन्‍य सामग्री वाचवली
Airport
Airport Dainik Gomantak
Published on
Updated on

पेडणे/मोरजी: मोपा विमानतळावर बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास लागलेल्या आगीत पाच ट्रक जळून खाक झाले. या दुर्घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण स्‍पष्‍ट झाले नसले तरी तेथील सुक्‍या गवताला लागलेली आग नंतर पसरत गेल्‍याचा अंदाज आहे. (Fire at airport)

Airport
निर्बंधांचाही ‘मार्च एंड’; 31 मार्चपासून कोरोना निर्बंध उठविण्याचा निर्णय

विमानतळ (Airport) बांधकामासाठी या ट्रकांचा वापर करण्‍यात येत होता. काही ट्रक एका बाजूला उभे करण्यात आले होते. त्यातील एका ट्रकला आग लागली व ही बाब लक्षात येण्‍यापूर्वीच अन्‍य पाच ट्रक आगीच्‍या भक्ष्‍यस्‍थानी पडले. मात्र या ट्रकांपासून (Truck) काही अंतरावर असलेली जेसीबी व अन्‍य यंत्रसामग्री हलवण्यास यश आले.

अगोदर शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत होता. पण नंतर अगोदर गवताला आग लागल्‍याचे स्‍पष्‍ट झाले. सर्व ट्रक जवळजवळ उभे असल्याने एकेक करत ते आगीच्‍या भक्ष्‍यस्‍थानी पडले. परिणामी कामगारांची धावपळ उडाली. त्‍यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला, परंतु यश आले नाही. पेडणे अग्निशामन दलाच्या जवानांनी आग विझवत असताना म्हापसा अग्निशामन दलाचा बंब घटनास्थळी पोहोचला. पण आग जास्त भडकल्याने ती विझविताना अडचणी निर्माण होऊ लागल्या.

Airport
लॉकडाऊननंतर गोव्यातील समुद्र किनारे कचऱ्याच्या गर्ततेत

परिसरात धुरांचे लोट; प्रवेशास केली मनाई

आग लागल्‍यानंतर मोपा परिसरात आगीच्या मोठ्या ज्‍वाळा व धुराचे लोट दिसत होते. परंतु नक्की काय झाले हे कुणालाच माहीत नव्हते. कारण विमानतळ परिसरात जायला कुणालाही देण्यात येत नव्हते. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनाही प्रवेश दिला जात नव्हता. त्यामुळे नक्की किती नुकसान झाले याची माहिती मिळू शकली नाही. अग्निशामक दलाच्या (Fire Brigade) जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा मोठा प्रयास केला. त्यामुळे बरीच मालमत्ता वाचली. कामगारांमध्‍येही गोंधळ उडाला. नक्की कोणत्या बाजूने आग लागली हेच समजत नव्‍हते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com