विद्यार्थिनीला रागावणे 5 शिक्षकांना पडले महागात; पणजी पोलिसांत गुन्हा दाखल, माफी मागण्याची नामुष्की...

मुलीच्या वडिलांनी दाखल केल्या 3 एफआयआर; मुलीचेही समुपदेशन
FIR Against 5 Teachers in Panaji
FIR Against 5 Teachers in PanajiDainik Gomantak
Published on
Updated on

FIR Against 5 Teachers in Panaji: पणजीतील एका शाळेतून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका विद्यार्थिनीला रागावल्यावरून येथील एका उच्च माध्यमिक शाळेतील पाच शिक्षकांवर पणजीच्या महिला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मुलीच्या वडिलांनी तक्रार दाखल केली होती. पण, गुन्हा दाखल झाल्याने या शिक्षकांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे.

शिक्षकांनी मुलीला फटकारले आणि तिच्या डेस्कवरून परीक्षेचे पेपर गोळा केले नाहीत, असे संबंधित मुलीच्या वडिलांनी तक्रारीत म्हटले आहे. वडिलांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी शिक्षकांविरुद्ध तीन प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल केले.

या विद्यार्थीनीशी शिक्षकांनी तीन वेळा गैरवर्तन केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे.

FIR Against 5 Teachers in Panaji
CM Pramod Sawant: गूड न्यूज! गोव्याच्या ग्रामीण भागात इंटरनेट स्पीड होणार सुसाट; मुख्यमंत्र्यांची माहिती

दरम्यान, पोलिसांनी सांगितले की, हे विद्यार्थिनीच्या गैरसमजाचे प्रकरण असून याप्रकरणी शिक्षकांनी माफी मागितली आहे. त्यानंतर त्या मुलीच्या वडिलांनी केस मागे घेण्यासाठी शपथपत्र दाखल केले आहे.

वडिलांनी पहिल्या एफआयआरमध्ये म्हटले होते की, मुलीला वेळेवर परीक्षेला उपस्थित न राहिल्यावरून शिक्षकांनी फटकारले. दुसऱ्या एफआयआरमध्ये एका शिक्षकाविरुद्ध परीक्षेत मुलीची उत्तरपत्रिका तिच्या डेस्कवरून उचलायला आले नाहीत, असे म्हटले होते.

तर तिसऱ्या एफआयआरमध्ये आणखी एका शिक्षकाविरुद्ध “तिला हे आणि ते करण्यास सांगितल्याबद्दल” नोंदवण्यात आली.

FIR Against 5 Teachers in Panaji
Goa Politician Scandal: सेक्स स्कँडल भोवणार; मंत्रीपद जाणार की राहणार?

एफआयआर नोंदवल्यानंतर वडिलांनी उच्च माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकांची भेट घेतली आणि पाच शिक्षकांनी माफी मागण्याची मागणी केली.

पोलिसांनी सांगितले की शिक्षकांनी माफी मागितली. त्यावर वडिलांनी आपल्या मुलीला शिक्षकांच्या माफीने 'समाधानी' आहे का? असे विचारले आणि तिने संमती दिल्यानंतर, वडिलांनी आपली तक्रार मागे घेतली.

तपासादरम्यान, पोलिसांनी इतर विद्यार्थ्यांशीही चर्चा केली. त्यातून शिक्षकांनी कोणत्याही विद्यार्थ्याशी कधीही गैरवर्तन केले नाही आणि संबंधित मुलीशीही गैरवर्तन केले नाही, असे समोर आल्याचे कळते. संबंधित मुलीचा काही गैरसमज झाला होता.

आम्ही मुलीचे समुपदेशन केले. तेव्हा तिला समजले की हा तिचा गैरसमज होता. आम्ही केस क्लोज करत आहोत, असे पोलिसांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com