Goa: देहविक्री व्यवसायातुन बाहेर पडलेल्या महिलांवर ओढावली बिकट परिस्थिती

women.jpg
women.jpg

पणजी: कोरोना काळात आर्थिक स्रोत हिरावल्यामुळे वंचित घटकातील महिलांना देहविक्रीचा पर्याय निवडावा लागत आहे. ज्या महिला यातून मोठ्या हिमतीने बाहेर पडल्या होत्या त्यांच्यावरही आता बिकट परिस्थिती ओढवली आहे. त्यामुळे त्या पुन्हा या दुष्टचक्रात अडकल्या आहेत. (Financial crisis is facing women who have come out of bad work)

अन्नाचा प्रश्न सुटला पण...
गतवर्षी संचारबंदीची घोषणा झाली तेव्हा देहविक्री करणाऱ्यावर उपासमारीची वेळ आली. ज्या महिला गैर सरकारी संस्थांच्या सहाय्याने या दुष्टचक्रातून बाहेर पडल्या त्यांनाही लॉकडाऊनमुळे आर्थिक कळ सोसावी लागली. त्यांनी सहा महिने कसेबसे आपल्या संसाराचा गाडा हाकलला. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने या घटकातील महिलांना मदत करण्याचे सरकारला आवाहन केले होते. तरीही, राज्य सरकारकडून अपेक्षित अशी मदत मिळाली नाही. राज्यातील अन्यायरहित जिंदगी या अशासकीय संस्थेने आपल्यापरीने शिधावाटप सुरू केले. असे असले तरी या समस्येचे हे शाश्वत उपाय नव्हते. 

\काहींसाठी अन्नाचा प्रश्न सुटला असला तरीही गॅस, घराचे भाडे, औषधोपचार यासारखे प्रश्न आहेतच. त्यामुळे शेवटी नाईलाजाने देहविक्रयचा पर्याय त्यांना निवडावा लागत आहे, असे ‘अर्ज’च्या ज्युलियाना लोहार सांगतात. 

अरुण पांडे म्हणाले, जागतिक पातळीवर अभ्यास केलेल्या अभ्यासकानुसार महामारी असो किंवा नैसर्गिक आपत्ती या परिस्थितीत वंचित घटकांतील लोकांवर याचा जास्त परिणाम होतो. कोरोना काळात राज्यातील आर्थिक वंचित घटकातील महिलांना देहविक्रय पर्याय निवडावा लागत आहे आणि हे दुर्दैव आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com