Cashew Cultivation : काजू लागवडीसाठी अर्थसाहाय्य : संतोष मळीक

Cashew Cultivation : पेडणे आणि सत्तरी तालुका सोसायटींचा करार
Cashew Cultivation
Cashew CultivationDainik Gomantak

Cashew Cultivation :

पेडणे तालुका शेतकरी सहकारी सोसायटीतर्फे सत्तरी शेतकरी सहकारी सोसायटीच्या माध्यमातून काजू कलम लागवडीसाठी आर्थिक साहाय्य मिळवून देणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष संतोष मळीक यांनी दिली.

त्यासाठी केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या काजू आणि कोकोआ विकास संचालनालय कोची यांच्याकडून आर्थिक साहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यासंदर्भात सत्तरी तालुका शेतकरी सहकारी सोसायटीशी सामंजस्य करार करण्यात आला आहे.

सत्तरी तालुका शेतकरी सहकारी सोसायटीच्या शिष्टमंडळाने नुकतीच पेडणे तालुका शेतकरी सहकारी सोसायटीला भेट देऊन संचालक मंडळासोबत चर्चा केली. या शिष्टमंडळात सत्तरी शेतकरी सहकारी सोसायटीचे अध्यक्ष अनिल काटकर, संचालक शहाजी देसाई, सीताराम देसाई, सत्तरी विभागीय कृषी अधिकारी विश्वनाथ गावस यांचा समावेश होता.

या बैठकीस पेडणे सोसायटीचे अध्यक्ष संतोष मळीक, उपाध्यक्ष शांबा सावंत, संचालक विठोबा बगळी, परब, ज्ञानेश्वर परब, सुहास नाईक, ॲड. अमित सावंत, उमेश गाड, राजाराम गावस, रामदास परब, कार्यकारी संचालक विनायक ठाकूर आदी उपस्थित होते.

यावेळी सत्तरी तालुका विभागीय कृषी अधिकारी विश्वनाथ गावस यांनी काजू लागवड योजनेची माहिती दिली. योजनेच्या अधिक माहितीसाठी पेडणे तालुका शेतकरी सहकारी सोसायटी कार्यालयाशी संपर्क साधावा.

एक एकरसाठी ८० कलमे :

लाभार्थींनी अर्ज भरून काजू लागवड करण्यात येणाऱ्या जमिनीचे १/१४ चे उतारे किंवा किसान कार्ड आणि बँक अकाऊंट आदी माहितीसह सादर करावेत. प्रत्येक लाभार्थीला एक एकरला ८० प्रमाणे तसेच जमिनीच्या उपलब्धतेनुसार जास्तीत जास्त ८०० कलमे या योजनेतून देण्यात येतील, असे कळविले आहे.

Cashew Cultivation
Goa Petrol Diesel Prices: गोव्यातील इंधनाच्या दरात किरकोळ बदल; जाणून घ्या पेट्रोल - डिझेलचे ताजे दर

वेंगुर्ला जातीची कलमे माफक दरात

केंद्र सरकारच्या काजू लागवड योजनेंतर्गत लाभार्थीला माफक दरात वेंगुर्ला -०४ किंवा वेंगुर्ला -०७ जातीची कलमे ३० रुपये दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी प्रतिहेक्टर काजू कलम लागवडीसाठी आर्थिक साहाय्य उपलब्ध करून दिले जाईल. शेतकऱ्यांना काजू लागवडीसाठी आलेला खर्च टप्प्या-टप्प्याने तीन वर्षांत पूर्णत: परत मिळणार आहे. त्यासाठी पेडणे तालुका शेतकरी सहकारी सोसायटीच्या कार्यालयात अर्ज उपलब्ध आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com