ओघळणारे अश्रू अन् दबलेले हुंदके!

लढा सुरूच:अंगणवाडी सेविकांच्या उपोषणाचा 28 वा दिवस, सरकारी अनास्थेबाबत संताप
Seven protesting Anganwadi teachers
Seven protesting Anganwadi teachersDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: तिन्ही सांजेची दिवेलागणीची वेळ, आझाद मैदानावरील चौफेर उघडे हुतात्मा स्मारकाच्या भूईवरच टाकलेल्या टाकलेल्या चटया आणि पेंगुललेल्या सात हतबल अबला अंगणवाडी सेविका आपल्या मागणीसाठी कण्हत आडव्या झाल्या आहेत. घरच्या,मुलाबाळांच्या आठवणींने ओघळणारे अश्रू पुसत,त्या हक्काच्या मागणीसाठी धुवांधार पासवातही त्या उघड्यावर गेली 28 दिवस उपोषण करून लढा देत आहेत. राज्यकर्त्यांना ना याची दखल घ्यावीशी वाटते, ना प्रशासनाला. या सरकारी अनास्थेबाबत सर्वसामान्यांतूनही संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

(Fight the hunger strike of Anganwadi workers for 28 days)

Seven protesting Anganwadi teachers
जमीन हडपप्रकरणी दुसरी अटक; एसआयटीने आवळला फास

मागील वर्षी डिसेंबर महिन्यात राज्यातील अंगणवाडी सेविकांनी आपल्या 11 मागण्यांसाठी आंदोलन छेडले होते. सरकारने यापैकी 3 महत्त्वाच्या मागण्या मान्य केल्या.त्यामुळे अंगणवाडी सेविकांनी आंदोलन मागे घेऊन सरकारचे आणि महिला आणि बालकल्याण खात्याचे आभार मानले. या आंदोलनाला कॉंग्रेससह बहुतांश विरोधकांचा पाठिंबा होता. पुढे निवडणुका झाल्या,त्यात तेच सरकार पुन्हा निवडून आले. आता या आंदोलनाच्या नेत्यांना अर्थात ज्योती सावर्डेकर, पौर्णिमा गावकर, रश्‍मिता नाईक, विद्या नाईक, खतिजा अथणीकर, निलम पालयेकर, ज्योती केरकर या अंगणवाडी सेविकांना मे महिन्याच्या सुरूवातीला बडतर्फ केले आहे. आणि बडतर्फीचे कारण देताना त्यांनी कॉंग्रेसने फूस लावल्याने आंदोलन केल्याचा ठपका महिला आणि बालकल्याण खात्याने ठेवला आहे.

Seven protesting Anganwadi teachers
येत्या तीन दिवसात राज्यात मुसळधार पावसाची शक्यता

अत्यंत दुर्दैवाची बाब म्हणजे महिला आणि बालकल्याण खात्याच्या या सेविका आहेत, निरागस मुलांच्या भावी जीवनाला आकार देण्याचे काम त्या करतात. मात्र, निर्लज्ज राजकर्ते आणि प्रशासनाच्या चुकीच्या धोरणांचा त्या बळी आहेत. या महिला कोणत्याही राजकीय पक्षाच्या नसताना त्यांच्यावर पक्षीय ठपका ठेवला आहे. -ॲड. हृदयनाथ शिरोडकर, सल्लागार अंगणवाडी सेविका संघटना

आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी निगडीत नाही. इथे बसलेल्या प्रत्येक महिलेच्या मतदारसंघातून भाजप आमदार निवडून आले आहेत. जर आम्ही आणि अंगणवाडी सेविकांनी कॉंग्रेसचे ऐकून मतदानही केले असते,तर या मतदारसंघांतून भाजप उमेदवार कसे निवडून आले असते. आमच्यावर ठेवलेला ठपका चुकीचा आहे.

- विद्या नाईक,

शिरोडा अंगणवाडी सेविका.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com