Goa Assault Case: झाडावरुन पडलेल्या अंब्यावरुन दोन कुटुंबांमध्ये फ्री स्‍टाईल हाणामारी; सरकारी वकिलासह 7 जणांवर गुन्हा दाखल

Goa Assault Case: झाडावरून खाली पडलेल्‍या एका मानकुराद आंब्यावरून दोन कुटुंबांमध्ये फ्री स्‍टाईल हाणामारी होण्याची घटना शेळपे-धुळेर येथे श्रीकृष्ण मंदिराजवळ घडली.
Goa Assault Case
Goa Assault CaseDainik Gomantak

Goa Assault Case

झाडावरून खाली पडलेल्‍या एका मानकुराद आंब्यावरून दोन कुटुंबांमध्ये फ्री स्‍टाईल हाणामारी होण्याची घटना शेळपे-धुळेर येथे श्रीकृष्ण मंदिराजवळ घडली. या प्रकरणी म्हापसा पोलिसांनी एका सरकारी वकिलासह सात जणांवर गुन्हा नोंद केला.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, ही घटना काल सोमवारी ( ता.२०) सायंकाळी साडेसात ते आठच्‍या सुमारास घडला. फिर्यादी साईश सुरेश चोडणकर यांच्‍या तक्रारीच्या आधारे संशयित आरोपी दयानंद राजाराम चोडणकर, सुजाता दयानंद चोडणकर व तेजस दयानंद चोडणकर (सरकारी वकील) यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्‍या ३२४, ३२६, ५०६(२), २७९, ३३६ व ३४ कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Goa Assault Case
Goa Crime: राज्यात चोर, हल्लेखोरांचा सुळसुळाट, कायदा-सुव्यवस्था ढासळली! काँग्रेसचा घणाघात

तर, सुजाता दयानंद चोडणकर यांनी दिलेल्‍या परस्‍परविरोधी तक्रारीनुसार संशयित आरोपी साईश सुरेश चोडणकर, चैताली साईश चोडणकर, सुजाता सुरेश चोडणकर व संपूर्णा सुरेश चोडणकर यांच्याविरोधात भादंसंच्या ४५१, ५०४, ३२४, ३२६, ५०६(२) व ३४ कलमांअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

परस्‍परविरोधी तक्रार देणाऱ्या सुजाता चोडणकर यांनी तक्रारीत म्‍हटले आहे की, संशयित साईश, चैताली, सुजाता व संपूर्णा यांनी मालमत्तेच्या वादातून फिर्यादींच्या घरात घुसखोरी केली. सुरी, दंडुक्‍यांनी मारहाण करत चावा घेत अंगावर जखम केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्‍यान, सर्व जखमींवर म्हापसा जिल्हा इस्पितळात उपचार करून घरी पाठवण्यात आले. पुढील तपास म्हापसा पोलिस करत आहेत.

Goa Assault Case
Goa Crime: रस्ता अडविणे, दंगल माजविणे याप्रकरणी कुंकळ्ळीत 400 भाविकांविरोधात गुन्हा

मारहाण करताना चावाही घेतला; अंगावर घातली गाडी

दोन्ही कुटुंबांमध्ये मालमत्तेचा वाद आहे. या मालमत्तेमध्येच एक मानकुराद आंब्याचे झाड आहे. हाच आंबा आता वादाचे कारण ठरत आहे. घटनेवेळी एक आंबा झाडावरून पडला. तो उचलण्यासाठी संपूर्णा सुरेश चोडणकर ही गेली असता दयानंद, सुजाता व तेजस यांनी तिच्यावर हल्ला चढवला. तिचा आवाज ऐकून आई, भाऊ व भावजय तिच्या मदतीला धावले.

संशयितांनी त्यांना सुरी, दंडुके व लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. शिवाय चावाही घेतला. त्यानंतर तेजस चोडणकर यांनी भरधाव वेगाने जखमींच्या अंगावर कारगाडी घातली, असे साईश चोडणकर याने तक्रारीत म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com