Goa Crime: राज्यात चोर, हल्लेखोरांचा सुळसुळाट, कायदा-सुव्यवस्था ढासळली! काँग्रेसचा घणाघात

Goa Crime: राज्यात भरदिवसा घरफोड्या होत आहेत. मंदिरांमधील फंडपेट्या फोडल्या जात आहेत. सोनसाखळी चोरांचा राज्यभर वावर वाढला आहे.
Congress spokesperson Vijay Bhike said that law and order has collapsed in Goa
Congress spokesperson Vijay Bhike said that law and order has collapsed in GoaDainik Gomantak

Goa Crime: राज्यात भरदिवसा घरफोड्या होत आहेत. मंदिरांमधील फंडपेट्या फोडल्या जात आहेत. सोनसाखळी चोरांचा राज्यभर वावर वाढला आहे. लूटमार, चोरी आणि खुनासारख्या भयंकर घटना घडत आहेत. धारगळ येथील खुनाच्या घटनेतून हे दिसून येते. पोलिसांचे भय अजिबात राहिलेले नाही. राज्यातील कायदा-सुव्यवस्था ढासळली आहे, असा आरोप काँग्रेस प्रवक्ते विजय भिके यांनी केला. शनिवारी पहाटे एका टॅक्सीचालकाला साळगाव-कळंगुट मार्गावर मद्यधुंद पर्यटकांनी मारले. ही घटना पोलिस चौकीसमोरच घडली.

यावरून राज्यातील कायदा-सुव्यवस्था ढासळली असून, परराज्यांतील लोकांनी ती हाती घेतली आहे काय, असा खोचक सवाल भिके यांनी केला. १५ दिवसांत २० जणांचा अपघाती मृत्यू झाला. पोलिस यंत्रणा, वाहतूक खाते, रस्त्यांची स्थिती या अपघातांना कारणीभूत आहे. पणजी स्मार्ट सिटीची कामे ३१ मेपर्यंत होणार आहेत. अवघ्या दहा दिवसांत ही कामे संपणार, अशी कोणती जादूची कांडी सरकार फिरविणार आहे, असा सवालही भिके यांनी केला.

Congress spokesperson Vijay Bhike said that law and order has collapsed in Goa
Goa Crime: कोलवाळ कारागृहाच्या जेल अधिक्षकांना कैदी विकट भगतची धमकी; पोलिसांकडून गुन्हा दाखल

गृह खाते ‘हॉलिडे मूड’वर

राज्यातील पोलिस यंत्रणा केवळ वसुलीची कामे करीत आहे. सध्या गृह खाते ‘हॉलिडे मूड''वर आहे. राज्यातील पोलिस जनतेला सुरक्षितता देण्यात अपयशी ठरले आहेत. धारगळच्या घटनेतून परराज्यांतील लोक गुन्हे करण्यासाठीच येथे येतात, असे दिसते. राज्यातील डोंगरी भाग विकायला काढला असून, वन खाते मूग गिळून गप्प असल्याची टीकाही भिके यांनी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com