Goa Tourism: गोव्यात महोत्सव आयोजन महागले!

पर्यटनाशी संबंधित प्रमुख कार्यक्रमांच्या शुल्कात १० टक्के वाढ
Goa Tourism
Goa TourismDainik Gomantak

पर्यटन उद्योगाशी संबंधित कार्यक्रमांसाठी परवानगी घेण्यासाठी आता देय शुल्कात तब्बल १० टक्के वाढ करण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश पर्यटन खात्याने जारी केला आहे. कोरोना महामारीच्या दोन वर्षांनंतर राज्यात पर्यटन हंगाम जोमाने सुरू झाला आहे. मात्र, गोव्यात विविध कार्यक्रम, महोत्सवांचे आयोजन महागणार आहे.

सुधारित शुल्क रचनेनुसार हंगाम नसताना नियमित शुल्काच्या एक पंचमांश शुल्क असणार आहे. सणांच्या काळात सुधारित शुल्काच्या पाचपट शुल्क असणार असून यात जीएसटीचा समावेश नाही. २० डिसेंबर ते ५ जानेवारीदरम्यानचा कालावधी ‘पीक सीझन’ आणि १ जून ते ३० सप्टेंबरदरम्यानचा कालावधी ‘ऑफ सीझन’ म्हणून गणला जातो. सुधारित शुल्क रचनेत पर्यटन खात्याला भरल्या जाणाऱ्या सुरक्षा ठेवींमध्ये मात्र कोणतेही बदल केलेले नाहीत, असे आदेशात स्पष्ट केले आहे.

Goa Tourism
Crime in Goa : दक्षिण गोव्यात गेल्या वर्षभरात तब्बल 235 चोरीच्या घटना

पर्यटन हंगामात (१ ऑक्टोबर ते ३१ मे) परवाना नसलेल्या परिसरात संगीत महोत्सवासाठी सुधारित शुल्क
- पाच हजार लोक - १० लाख रुपये,
- पाच ते दहा हजार लोक - १५ लाख,
- दहा हजारहून जास्त लोक - २० लाख.
- नाईट बझारसाठी - ६० हजार. (प्रतिहंगाम)
- मोटारसायकल विक, कार रॅली, तिकीट नसलेले संगीत महोत्सव, प्रदर्शने आणि युवा महोत्सव - ७५ हजार.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com