Goa Mining: चार मतदारसंघांमध्ये कोळसा प्रदूषणाची धास्ती

Goa Mining: आमदार संकल्प आमोणकरांनी थोपटले दंड
Goa Mining
Goa MiningDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Mining:

मुरगाव बंदरातील कोळसा हाताळणीमुळे मुरगाव तालुका तसेच वास्को शहराबरोबर इतर भागांत कोळसा प्रदूषणामुळे लोक भयभीत झाले आहेत. या प्रदूषणावर मुरगाव तालुक्यातील चारही मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आवाज उठवित नसल्याने लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मात्र, आमदार संकल्प आमोणकर यांनी या प्रदूषणाविरोधात दंड थोपटले आहेत. वास्कोत दिवसेंदिवस कोळसा, बॉक्साईट यांच्या हाताळणीपासून प्रदूषण वाढत आहे. परिणामी मुरगावातील लोकांच्या घरात कोळसाच कोळसा दिसतो.

प्रत्येकाच्या घरात पाय ठेवला तर तळवे काळेकुट्ट दिसतात. घरातील सर्व वस्तुही काळवंडून जातात. याहून भयंकर म्हणजे, दिवसागणिक येथील लोकांच्या पोटात भरपूर प्रमाणात कोळशाची भुकटी जाते. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतात. येथील लोक वेगवेगळ्या आजारांनी त्रस्त आहेत.

Goa Mining
Watermelon Benefits: कलिंगड खाण्याचे नेमके फायदे काय; उन्हळ्यात का खातात कलिंगड?

समाजसेवक शंकर पोळजी यांनी येथील लोकांनी रस्त्यावर उतरून कोळसा प्रदूषणाविरोधात आवाज उठविण्याचे आवाहन केले आहे. तसेच मुरगाव तालुक्यातील चारही मतदारसंघांचे लोकप्रतिनिधी तसेच मुरगावातील नगरसेवक मूग गिळून गप्प बसले असल्याचे सांगून त्यांनी नाराजी व्यक्त केली.

शुक्रवारी बैठक

मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी कोळसा प्रदूषणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी एमपीए अध्यक्षांची भेट घेतली. प्रभाग क्रमांक १ ते ९ च्या नगरसेवकांनी येत्या शुक्रवारी निश्चित केलेल्या एमपीएच्या बैठकीत उपस्थित राहणे आवश्यक आहे. कोळसा प्रदूषणाच्या विरोधात मुरगाव मतदारसंघातील सर्व नगरसेवकांनी एकत्र येऊन सहकार्य करावे, असे आवाहन आमदार संकल्प आमोणकर यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com