कार्डेलिया क्रूजवरील घटनेचा गोव्यातील पर्यटनावर परिणाम होण्याची शक्यता

मुरगाव हार्बर बंदरात लागणाऱ्या पर्यटक जहाजांवर संशय व्यक्त करून, राज्यात अमली पदार्थ आणण्यात जलमार्गाचा उपयोग होत नसेल ना? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
Cordelia tourist ship
Cordelia tourist shipDainik Gomantak

मुरगाव पत्तन न्यास (MPT) मधील हार्बर क्रुज जेटीवर पर्यटक जहाज (Tourist Ship) मोसमाला गेल्या आठवड्यापासून सुरू झाली आहे. मात्र यंदाच्या मोसमात प्रथमच लागलेल्या कार्डेलिया पर्यटक जहाजात (Cordelia tourist ship) मुंबईत अमली पदार्थविरोधी पथकाने छापा (Raid by anti-drug squad) टाकून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले आहेत. या छाप्यात बॉलीवूडच्या अभिनेत्याचा मुलगा, उद्योजकाचे मुलगे व काही राजकीय संबंध असलेल्यांना अटक झाली आहे. यामुळे मुरगाव हार्बर बंदरात (Mormugao Harbor Port) हार्बर कृज जेटीवर लागणाऱ्या पर्यटक जहाजांवर आता अनेकांनी संशय व्यक्त करून राज्यात अमली पदार्थ (Drugs) आणण्यात जलमार्गाचा उपयोग होत नसेल ना? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Cordelia tourist ship
राज्यातील बंद असलेली चार्टर विमानसेवा पुन्हा सुरु होण्याची शक्यता

गेल्या आठवड्यापासून मुरगाव पत्तन न्यास (एमपीटी) हार्बर क्रुज जेटीवर पर्यटक जहाज कार्डेलिया दाखल झाले आणि पर्यटक हंगामाला सुरुवात झाली. संपूर्ण देशात कोरोना महामारीमुळे गोव्यातील पर्यटक हंगाम सुरू झाला नव्हता. कोरोना विषाणू काही प्रमाणात कमी झाल्याने राज्यात पर्यटक हंगामाला सुरुवात करण्यात आली. मुरगाव बंदरातील हार्बर क्रुज जेटीवर पर्यटक जहाजाचा मोसम गेल्या आठवड्यात सुरू झाल्याने, प्रथमच मुंबईतून कार्डेलिया पर्यटक जहाज अंदाजे 1500 पर्यटकांना घेऊन गोव्यात दाखल झाले होते.

एनसीबीच्या तपासात कार्डेलिया क्रूजवर अमली पदार्थ सापडल्याने गोव्यात पर्यटनावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाल्याने आता हे जहाज गोव्यात येणार की नाही याविषयी साशंकता निर्माण झाली आहे. कारण सदर जहाजाच्या 58 फेऱ्या गोव्यात 2023 पर्यंत होत्या. यातून जवळ जवळ लाखभर पर्यटक गोव्यात दाखल होणार होते. त्यामुळे गोव्याचा पर्यटन व्यवसायाला उभारी मिळणार होती.

Cordelia tourist ship
मुख्यमंत्र्यानी आश्वासन दिल्याप्रमाणे गोव्याला खड्ड्येमुक्त करावे: खांडेकर

रविवारी रात्री मुंबई अमली पथकाने कार्डेलिया पर्यटक जहाजावर अचानक छापा टाकून बॉलीवूड अभिनेत्याच्या मुलाला, उद्योजकांच्य मुलांना व राजकीय संबंध असलेल्या मुलांना, एन सी बीने ड्रग्सप्रकरणी पकडले होते. यामुळे गोव्यातील पर्यटक जहाज मोसमाला जबरदस्त फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तसेच याचा गोव्यात विधानसभा निवडणुकीचे वातावरण असल्याने इतर राज्यातील पक्षांनी येथे येऊन चक्क गोवा अमली पदार्थाचे ड्रग्स हब असल्याचे प्रचार करीत आहे. यामुळे कदाचित गोव्यात ड्रग्स जल मार्गातून येत असू शकतो. मुंबईतील एका पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा गोवा ड्रग्स प्रकरणात सहभाग असल्याचे पत्रकार परिषदेतून जाहीर केले होते. यामुळे अधिकच संशय जल मार्गाच्या पर्यटनावर होत आहे. मुरगाव हार्बर क्रुज जेटीवर जास्तकरून पर्यटक जहाजे मुंबईहुन जलमार्गे येत असल्याने कदाचित येथूनच गोव्यात अमली पदार्थ व्यवसाय होत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com