FDA Raid: ग्राहकांच्या तक्रारी, 'एफडीए'ची हजेरी; मडगाव, फातोर्डा, वेर्णा येथील अस्वच्छ आस्थापनांवर कारवाई

FDA Raid In Salcette: सासष्टी तालुक्यातील विविध भागांतील रेस्टॉरंट्स व खाद्यव्यवसाय करणाऱ्या आस्थापनांची अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे तपासणी मोहीम राबविण्यात आली.
FDA Raid
FDA RaidDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: ग्राहकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींसह नियमित तपासणी उपक्रमांतर्गत एकूण ६ खाद्यसंस्थांची तपासणी करण्यात आली असून, बहुतेक ठिकाणी ‘एफएसएसएआय’च्या नियमांची पायमल्ली झाल्याचे आढळले.

सासष्टी तालुक्यातील विविध भागांतील रेस्टॉरंट्स व खाद्यव्यवसाय करणाऱ्या आस्थापनांची अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे तपासणी मोहीम राबविण्यात आली. या तपासणी मोहिमेमध्ये दक्षिण गोव्याच्या नियुक्त अधिकारी संज्योत कुडाळकर, वरिष्ठ खाद्य सुरक्षा अधिकारी प्रिया देसाई तसेच माधव कवळेकर, प्रदीक्षा चोपडेकर आणि अमरदीप गावडे सहभागी होते.

FDA Raid
Goa Politics: पक्षशिस्त मोडल्यास 'डायरेक्ट अ‍ॅक्शन', दामू नाईकांचा आर्लेकर-आजगावकर यांना इशारा; म्हणाले, "सांगणार नाही, थेट कारवाईच करणार"

बोर्डा-मडगाव येथील बावर्ची रेस्टॉरंटमध्ये तपासणी केली असता आस्थापनांत पाणी साठलेले आणि स्टोरेज परिसर न रंगवलेला आढळून आला. ड्रमायन कर्मचाऱ्यांना स्वच्छतेसंबंधित पोशाख दिलेले नाहीत, हेदेखील यावेळी स्पष्ट झाले. किटकनाशके व वैद्यकीय तपासणीची कागदपत्रे उपलब्ध नव्हती. आस्थापनाकडून विहिरीचे पाणी वापरण्यात येत होते. मात्र, पाण्याच्या चाचणी अहवालाची उपलब्धता नव्हती. त्यामुळे ३ दिवसांत त्रुटी दूर करण्याचे निर्देश आस्थापनाला दिले आहेत.

फातोर्डा येथील महालक्ष्मी रेस्टॉरंटमध्ये कर्मचाऱ्यांना पोशाख उपलब्ध नव्हते, आवश्‍यक किटकनाशके व वैद्यकीय कागदपत्रे नव्हती, खिडकीसाठी जाळी बसवलेली नव्हती अशा त्रुटी आढळल्याने त्रुटींविषयी तपासणी अहवाल देऊन सुधारण्याचे आदेश आस्थापनाला देण्यात आले आहेत.

पाच दिवसांत सुधारणा करा!

वेर्णा अँटिक म्हार्दोळ येथे गंजलेले चाकू आढळले. तसेच साठवण कंटेनर बदलणे आवश्यक, धुण्याच्या विभागात विभाजन आवश्यक, गटार झाकणे व किचनच्या मागील भागाची सफाई करणे आवश्यक असून ते नसल्याने ५ दिवसांत सुधारणा करण्याचे आदेश देण्यात आले.

वेर्णा येथील लक्ष्मी बेकरीमध्ये फरशा तुटलेल्या परिस्थितीत आढळला आणि परिसराचा रंग उडालेला होता. तसेच कर्मचारी अपुरे पोशाखात दिसल्याने अधिकाऱ्यांनी ५ दिवसांत सुधारणा करण्याचे निर्देश जारी केले.

FDA Raid
Goa Made Liquor Seized: गोव्यातून कर्नाटकला दारू तस्करी, शक्कल लढवली पण... 12 लाखांचे मद्य जप्त

‘एफएसएसएआय’ परवाना नाही

1 वेर्णा येथील न्यू सिटी बार अँड रेस्टॉरंटमध्ये तपासणीदरम्यान स्वयंपाकघरात तुटलेल्या फरशा, पाणी साचलेले, कर्मचाऱ्यांना योग्य पोशाख नाही हे उघडकीस आले. ‘एफएसएसएआय’ परवाना उपलब्ध नव्हता, त्यामुळे अधिकाऱ्यांकडून विनापरवाना व्यवसाय चालविल्यामुळे नोटीस व तपासणी अहवाल देण्यात आला.

2 वेर्णा येथील लझीझ शेफ किचनकडे ‘एफएसएसएआय’ परवाना नव्हता. तसेच पाण्याचा फिल्टर व एक्झॉस्ट फॅन नव्हते, भिंती प्लास्टर न केलेल्या, वैद्यकीय व कीटकनाशन कागदपत्रे अनुपलब्ध, विनापरवाना व्यवसाय राबवित असल्याने नोटीस देऊन व्यवसाय थांबविण्याचे आदेश देण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com