FDA raid Calangute: विनालेबल 150 किलो अन्नसाठा जप्त, कळंगुट येथे एफडीएची कारवाई; विशेष मोहीम सुरूच राहणार

Unlabeled food seized Goa: अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कळंगुट परिसरातील एका जनरल स्टोअरवर धडक कारवाई करत सुमारे १५० किलो विनालेबल अन्नसाठा जप्त केला आहे.
FDA raid Calangute
FDA raid CalanguteDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कळंगुट परिसरातील एका जनरल स्टोअरवर धडक कारवाई करत सुमारे १५० किलो विनालेबल अन्नसाठा जप्त केला आहे. अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित व्यापाऱ्याला ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एफडीएच्या पथकाने हॉटेल्सची तपासणी करण्यासाठी विशेष मोहीम राबवली होती. या दरम्यान काही हॉटेल्समध्ये विनालेबल उत्पादने आढळली. त्या उत्पादनांच्या बिलांचा माग काढला असता, कळंगुटमधील एका विशिष्ट जनरल स्टोअरमधून हा पुरवठा होत असल्याचे उघड झाले. त्यानंतर एफडीएच्या पथकाने संबंधित स्टोअरवर छापा टाकला असता तेथे सुमारे १५० किलो विनालेबल अन्नसाठा आढळून आला.

FDA raid Calangute
Goa Bank Fraud: बँक मॅनेजरच निघाला भामटा! 64.25 लाखांच्या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल, ग्राहकांच्या नावे परस्पर काढले कर्ज

संबंधित व्यापाऱ्याने नियमांचे उल्लंघन करण्याची ही दुसरी वेळ असून, यापूर्वी सात-आठ महिन्यांपूर्वी त्याला समज देण्यात आली होती.

FDA raid Calangute
Goa Premier League: धेंपो क्लबची नाट्यमय मुसंडी; अंतिम फेरीत धडक, पणजी जिमखान्याला नमविले

गूळ विक्रीवरही प्रशासनाची नजर...

या कारवाईसोबतच तिसवाडी व इतर भागांत रस्त्यावर तामिळनाडूतून आणलेला गूळ विकला जात असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली आहे. या गुळाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून, अहवालानंतर संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com