Indian Super League: एफसी गोवाची `होम` मोहीम नोव्हेंबरपासून

आयएसएल फुटबॉल : स्पर्धेच्या नव्या मोसमास सात ऑक्टोबरपासून सुरवात
Indian Super League: एफसी गोवाची `होम` मोहीम नोव्हेंबरपासून
Published on
Updated on

पणजी: फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर ऑक्टोबर महिन्यात 17 वर्षांखालील महिला विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील सामने होतील, त्यामुळे इंडियन सुपर लीग (Indian Super League) फुटबॉलसाठी मैदान अनुपलब्ध असेल, या कारणास्तव स्पर्धेस सात ऑक्टोबर रोजी सुरवात झाल्यानंतर एफसी गोवा (FC Goa) थेट तीन नोव्हेंबरला घरच्या मैदानावर (होम) सामना खेळेल.

फुटबॉल स्पोर्टस डेव्हलपमेंट लिमिटेडने (एफएसडीएल) आयएसएल स्पर्धेच्या 2022-23 मोसमाचे वेळापत्रक गुरुवारी जाहीर करण्यात आले. स्पर्धेतील पहिला सामना सात ऑक्टोबरला कोची येथे गतउपविजेते केरळा ब्लास्टर्स व ईस्ट बंगाल यांच्यात खेळला जाईल. आयएसएल स्पर्धा पुढील वर्षी मार्चमध्ये संपेल, नंतर एप्रिलमध्ये सुपर कप स्पर्धा खेळली जाईल.

Indian Super League: एफसी गोवाची `होम` मोहीम नोव्हेंबरपासून
काणकोण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा देखावा ठरतोय आकर्षण

एफसी गोवा 12 ऑक्टोबरला मैदानात

एफसी गोवाचा पहिला सामना 12 ऑक्टोबरला कोलकात्यात ईस्ट बंगालविरुद्ध होईल. घरच्या मैदानावर ते तीन नोव्हेंबरला जमशेदपूर एफसीविरुद्ध खेळतील. त्यांचा स्पर्धेतील शेवटचा साखळी सामना 23 फेब्रुवारी रोजी बंगळूर एफसीविरुद्ध बंगळूर येथे होईल. गोव्यात 11 ते 26 ऑक्टोबर या कालावधीत उपांत्य फेरीतील लढतीसह 17 विश्वकरंडक स्पर्धेतील एकूण 16 सामने होणार आहेत.

फुटबॉलप्रेमी पुन्हा स्टेडियमवर

ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत यावेळच्या आयएसएल स्पर्धेत एकूण 117 सामने खेळले जातील. दोन मोसमानंतर यंदा पुन्हा फुटबॉलप्रेमी स्टेडियमवर परतणार आहेत. जागतिक पातळीवरील फुटबॉल लीगच्या धर्तीवर यंदा आयएसएल सामने आठवड्यात गुरुवार ते रविवार या कालावधीत खेळले जातील. कोविड-19 महामारी निर्बंधांमुळे 2020-21 व 2021-22 या दोन्ही मोसमात सामने गोव्यात बंद दरवाज्याआड रिकाम्या स्टेडियमवर झाले होते.

Indian Super League
Indian Super LeagueDainik Gomantak

प्ले-ऑफ फेरीच्या स्वरुपात बदल

आयएसएल स्पर्धेच्या 2022-23 मोसमापासून प्ले-ऑफ फेरी स्वरूपात बदल करण्यात आला आहे. साखळी फेरीतील पहिले दोन संघ थेट उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. तिसऱ्या ते सहाव्या क्रमांकावरील चार संघांत दोन एलिमिटेर सामने होतील आणि त्यातील दोन विजेते संघ उपांत्य फेरीत साखळी फेरीतील अव्वल दोन संघाविरुद्ध खेळतील.

Indian Super League: एफसी गोवाची `होम` मोहीम नोव्हेंबरपासून
Goa: ड्रग माफिया विरोधात तीन महिन्यात कडक कारवाई - मुख्यमंत्री सावंत यांचे आश्वासन

दृष्टिक्षेपात 2022-23 मोसम

07 ऑक्टोबर : स्पर्धेला सुरवात

26 फेब्रुवारी : शेवटचा साखळी सामना

मार्च 2023 : प्ले-ऑफ, उपांत्य व अंतिम फेरी

09ऑक्टोबर : गतविजेत्या हैदराबाद एफसीचा पहिला सामना गाचिबौली-हैदराबाद येथे मुंबई सिटीविरुद्ध

11 ऑक्टोबर : लीग शिल्ड विजेत्या जमशेदपूर एफसीचा पहिला सामना ओडिशा एफसीविरुद्ध जमशेदपूर येथे

29 ऑक्टोबर व 25 फेब्रुवारी : एटीके मोहन बागान आणि ईस्ट बंगाल यांच्यातील कोलकाता डर्बी

Indian Super League: एफसी गोवाची `होम` मोहीम नोव्हेंबरपासून
Ganeshotsav: दीड दिवसाच्या गणपतीचे थाटात विसर्जन

एफसी गोवाचे साखळी सामने

पहिला टप्पा

12 ऑक्टोबर : विरुद्ध ईस्ट बंगाल (कोलकाता), 21 ऑक्टोबर : विरुद्ध चेन्नईयीन (चेन्नई), 29 ऑक्टोबर : विरुद्ध हैदराबाद (हैदराबाद), 03 नोव्हेंबर : विरुद्ध जमशेदपूर (फातोर्डा), 13 नोव्हेंबर : विरुद्ध केरळा ब्लास्टर्स (कोची), 20 नोव्हेंबर : विरुद्ध एटीके मोहन बागान (फातोर्डा), 26 नोव्हेंबर : विरुद्ध बंगळूर (फातोर्डा), 01 डिसेंबर : विरुद्ध मुंबई सिटी (मुंबई), 10 डिसेंबर : विरुद्ध ओडिशा (फातोर्डा), 17 डिसेंबर : विरुद्ध नॉर्थईस्ट युनायटेड (फातोर्डा).

दुसरा टप्पा

22 डिसेंबर : विरुद्ध जमशेदपूर (जमशेदपूर), 28 डिसेंबर : विरुद्ध एटीके मोहन बागान (कोलकाता), 05 जानेवारी : विरुद्ध हैदराबाद (फातोर्डा), 15 जानेवारी : विरुद्ध नॉर्थईस्ट युनायटेड (गुवाहाटी), 22 जानेवारी : विरुद्ध केरळा ब्लास्टर्स (फातोर्डा), 26 जानेवारी : विरुद्ध ईस्ट बंगाल (फातोर्डा), 06 फेब्रुवारी : विरुद्ध ओडिशा (भुवनेश्वर), 11 फेब्रुवारी : विरुद्ध मुंबई सिटी (फातोर्डा), 16 फेब्रुवारी : विरुद्ध चेन्नईयीन (फातोर्डा), 23 फेब्रुवारी : विरुद्ध बंगळूर (बंगळूर).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com