खासगी क्षेत्रात गोमन्तकीयांना 80 टक्के नोकऱ्यांची मागणी, विजय सरदेसाई दुसऱ्यांदा मांडणार विधेयक

गोवा स्टेट एम्पलॉयमेन्ट ऑफ लोकल कॅन्डिडेट बिल, 2024 येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर करणार असल्याची माहिती सरदेसाई यांनी दिली.
Goa Budget Session 2024-25 | Vijai Sardesai
Goa Budget Session 2024-25 | Vijai SardesaiDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Budget Session 2024-25: गोव्यात निर्माण होणाऱ्या नोकरीच्या संधीबाबत प्रथम गोमन्तकीयांचा विचार केला जावा, खासगी क्षेत्रात गोमन्तकीयांना 80 टक्के नोकऱ्यांची मागणी करणारे खासगी विधेयक गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई दुसऱ्यांदा मांडणार आहेत.

गोवा स्टेट एम्पलॉयमेन्ट ऑफ लोकल कॅन्डिडेट बिल, 2024 येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर करणार असल्याची माहिती सरदेसाई यांनी दिली.

'गोंयकार प्रथम, कसलीही वाटाघाटी, कसलीही तडजोड नाही. गोव्यात निर्माण होणाऱ्या नोकऱ्यांच्या सर्व संधींमध्ये गोंयकारांना प्राधान्य द्यावे हे आमच्या पक्षाचे उद्दिष्ट आणि आमच्या अस्तित्वाचे सार आहे.'

'मी याबाबत अनेकवेळा मत मांडले आहे. गोवा सरकारची उदासीनता भयावह असून, गोंयकारांना त्यांच्याच भूमीत रोखण्यासाठी होणारा हस्तक्षेप धक्कादायक आणि अस्वीकार्य आहे.'

'खाजगी उद्योगांमध्ये गोमन्तकीयांना 80 टक्के नोकऱ्या देण्याच्या आमच्या मागणीपासून मी कधीही मागे हटणार नाही आणि यासाठी दुसऱ्यांदा खाजगी सदस्य विधेयक सादर करत आहे,' असे ट्विट विजय सरदेसाई यांनी केले आहे.

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 02 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री डॉ. प्रमोद सावंत 2024-25 चा अर्थसंकल्प सादर करतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

vijai sardesai warns goa govt
mla vijai sardesai slams goa govt
MLA Vijai Sardesai Court Warning
Mirabag Protest
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com