Dr. Jaivant Sardesai Passed Away: युनो या आंतरराष्ट्रीय संस्थेसाठी मोलाचे कार्य केलेले प्रसिद्ध किटाणूशास्त्रज्ञ डॉ. जयवंतराव सरदेसाई (94) यांचे आज दुपारी निधन झाले. उद्या सायंकाळी चार वाजता त्यांच्या पार्थिवावर मडगावच्या मठग्रामस्थ हिंदू सभेच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
डॉ. सरदेसाई हे फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांचे वडील असून दै.गोमंतकचे संपादक संचालक राजू नायक तसेच प्रसिद्ध चित्रकार डॉ. सुबोध केरकर यांचे ते सासरे होत. त्यांच्यामागे पुत्र विजय तसेच कन्या डॉ. सविता केरकर, सुन, जावई व नातवंडे असा परिवार आहे.
डाॅ. सरदेसाई यांची प्रकृती काही दिवसांपूर्वी खालावल्याने त्यांना सुरुवातीला गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पीतळात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती स्थिरस्थावर झाल्यानंतर ते साळगाव येथे आपली कन्या सविता केरकर यांच्या घरी रहायला गेले होते. तिथेच आज दुपारी 1.15 वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले.
गोव्यात कोकण रेल्वे सुरु हाेण्यास सगळीकडे विरोध होत असताना डॉ. सरदेसाई यांनी या प्रकल्पाला खंबीरपणे पाठिंबा दिल्याने आणि कोकण रेल्वे सध्याच्या मार्गाने सुरु झाल्यास पर्यावरणावर त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही हे शास्त्रोक्तपणे पटवून दिल्यामुळे या रेल्वेचा मार्ग खुला झाला होता. गोव्यासाठी त्यांचे हे मोठे योगदान होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.