Fatorda: नागरिकांच्या आरोग्याशी खेळ! बेकायदेशीर मासळी विक्रीमुळे परिसर दुर्गंधीमय; डासांची पैदास वाढली

Fatorda Madel: त्‍या भागात डासांची पैदास वाढली आहे, जी आरोग्याला हानिकारक आहे. त्यामुळे आरोग्य खात्याने या बेकायदेशीर मासळी विक्रेत्यांवर व व्यवहार करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा.
Matsya Haat Margao Fish Market
Matsya Haat Margao Fish MarketDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: फातोर्डा येथील माडेल येथे होत असलेल्या बेकायदेशीर मासळी विक्रीमुळे तसेच मासळी उतरवित असल्याने परिसर दुर्गंधीमय झाला आहे. चोहोबाजूंनी थर्माकॉलचे बॉक्स पडलेले आढळतात. त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे.

त्‍या भागात डासांची पैदास वाढली आहे, जी आरोग्याला हानिकारक आहे. त्यामुळे आरोग्य खात्याने या बेकायदेशीर मासळी विक्रेत्यांवर व व्यवहार करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा, असा आदेश मडगाव नगरपालिकेला दिला आहे.

स्थानिकांनीसुद्धा याबद्दल तक्रारी केल्या आहेत. सावियो जुवांव मारिया डायस यांची तक्रार ७ ऑगस्ट रोजी नागरी आरोग्य केंद्राला मिळाली. त्यानुसार १३ रोजी आरोग्य अधिकाऱ्यांनी माडेल - फातोर्डा येथील या परिसराची पाहणी केली.

Matsya Haat Margao Fish Market
Ponda Fish Market: 'आजच दुकाने खाली करा'! पालिकेमुळे फोंडा मासळी मार्केटमधील व्यापाऱ्यांचा गोंधळ; मुख्यमंत्र्यांचे सहकार्य

मासळी उतरविण्यासाठी लिडिया नोरोन्हा यांच्या मालकीच्या जागेचा चार ते पाच मासळी विक्रेते वापर करीत असल्याचे पाहणीत आढळून आले. शिवाय तेथे ९ मासळीवाहू वाहने ठेवण्यात आली होती. स्वच्छतेचा अभाव तिथे दिसून आला.

Matsya Haat Margao Fish Market
Margao Accident: समोरासमोर 2 कार धडकल्या, फातोर्ड्यात वाहतूक खोळंबली; Video

मडगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी तात्काळ या मासळी विक्रेत्यांवर कारवाई करावी असा आदेश आरोग्य खात्यातर्फे करण्यात आला आहे. या आदेशाची प्रत जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आली आहे. त्याचबरोबर माडेलच्या रहिवाशांना यासंदर्भात पाठपुरावा करण्यास सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com