Curchorem: कुडचडे येथील युवती दुधसागर नदीत बुडाली

पाय घसरल्याने नदीत बुडाल्याची प्राथमिक माहिती
Curchorem News
Curchorem News Dainik Gomantak
Published on
Updated on

धावकोण ताकार येथे दुधसागर नदीत बुडून एका युवतीचा अंत झाला असल्याची घटना समोर आली आहे. यात 15 वर्षीय युवतीचा अंत झाला असून ही घटना गुरुवारी संध्याकाळी घडली. आज या यूवतीचा मृतदेह शवचिकित्सा पुर्ण झाल्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

(Fatima Mulla from Curchorem drowned in Dudhsagar river)

Curchorem News
Sanguem: सांगे आयआयटीला विरोध सुरुच; नागरिक संतापले

मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 6 आक्टोबर रोजी सायंकाळी धावकोण ताकार येथे फातिमा मुस्ताक मुल्ला वय 15 या युवतीचा दुधसागर नदीपात्राकडे गेली असता पाय घसरल्याने ती नदीत पडली व यातच बुडून तीचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

Curchorem News
Goa News: रस्ता डांबरीकरणासाठी जांबोटीत नागरिकांचा एल्गार

या युवतीच्या मृतदेहाचा शोध बराच वेळ नदी पात्रात सुरु होता. रात्री उशिरा तो पोलिसांच्या हाती लागला. मिळालेल्या माहितीनुसार ही युवती कुडचडे, बेपकेगाळ येथील असून, आज शवचिकित्सा पुर्ण झाल्यानंतर मृतदेह कुटुंबियाच्या स्वाधीन करण्यात आला. मात्र 15 वर्षीच फातीमाचा मृत्यू झाल्याचे समजताच बेपकेगाळ परिसरात शोककळा पसरली होती.

प्राथमिक माहितीत या युवतीचा अंत हा पाय घसरुन झाला अशी माहिती समोर आली असली तरी, यामागे काही घातपात आहे का? तसेच या मृत्यूमागे आणखी कोणते कारण आहे का? याचाही तपास सुरु असल्याचं देखील पोलिसांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa bench Fire Case
Supreme Court PWD Workers Goa
Goa Forward Suspends Alliance Talks
Swiggy Rs 93 Lakh Theft
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com