खून झालेल्या 'त्या' चार वर्षीय बाळाचे वडील भारतात दाखल, शवविच्छेदनास दिली संमती

मुलाचे वडील मंगळवारी संध्याकाळी जकार्ताहून भारतात परतले.
खून झालेल्या 'त्या' चार वर्षीय बाळाचे वडील भारतात दाखल, शवविच्छेदनास दिली संमती
Published on
Updated on

गोव्यात आईने खून केलेल्या चार वर्षीय मुलाचे वडील मंगळवारी संध्याकाळी जकार्ताहून भारतात परतले. चित्रदुर्ग पोलिसांनी मुलाच्या हत्येची माहिती त्यांना दिली होती.

मृत मुलाचे वडील चित्रदुर्ग येथे दाखल झाल्यानंतर त्यांनी मुलाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यास अधिकाऱ्यांना संमती दिली आहे.

व्यंकट रमण असे या मृत मुलाच्या वडिलांचे नाव आहे. 'जकार्ता (इंडोनेशिया) येथे असलेले मुलाचे वडील रमण यांच्याशी पोलिसांनी संपर्क साधला आणि घटनेबद्दल माहिती दिली. रमण तात्काळ परत येण्यासाठी निघाले व मंगळवारी संध्याकाळी चित्रदुर्ग येथे आल्यावर त्यांनी मुलाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यास अधिकाऱ्यांना संमती दिली,' असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान, प्राथमिक तपासानुसार महिलेने आपल्या मुलाला गळफास लावून खून केला आणि त्यानंतर तिने मनगट कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

एका आर्टिफिशियल इंटेलिजेंस स्टार्ट-अपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) असलेल्या सुचना सेठ या मुलाच्या आईने कथितरित्या गोव्यात हत्या केली होती. उत्तर गोव्यातील सिकेरी येथील सर्व्हिस अपार्टमेंटमध्ये 6 ते 8 जानेवारी दरम्यान ही घटना घडली, असे पोलिसांनी सांगितले.

संशयित महिला पतीपासून वेगळी झाली होती. पतीसोबतच्या तणावपूर्ण संबधामुळे ती नाराज होती तसेच, त्यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया देखील सुरु असून, मुलाच्या कस्टडीसाठी लढाईसाठी सुरु होती. अशी माहिती उत्तर गोवा पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी दिली.

याच वादातून मुलाचा खून केला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Sexual Assault Case
Goa Uncle Murder Case
Goa High Court Minor Child
 Mandar Surlkar murder case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com