Goa Assembly Monsoon Session 2023: शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी ख्रिस्ती धर्मगुरू फादर बोलमॅक्स परेरा यांच्यावर गुन्हा दाखल झाला. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी बोलमॅक्स यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी शिवप्रेमींनी ठिय्या आंदोलन केले होते.
बोलमॅक्स यांनी अटक टाळण्यासाठी मडगाव न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने परेरा यांचा जामीन अर्ज मंजूर केला असून, त्यांना दिलासा मिळाला आहे. याप्रकरणी आमदार सरदेसाई यांनी विधानसभेत गोंयकरांच्या एकीचे आणि गृह खात्याचे आभार मानले.
काय म्हणाले आमदार विजय सरदेसाई?
"दुपारी एक बातमी समोर आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी फादर परेरा यांना जामीन मंजूर झाला. याबाबत गोव्यातील जनतेचे आणि गृहखात्याचे आभार मानले पाहिजेत. मागील काळात राज्यात निर्माण झालेली परिस्थिती गोव्याच्या एकीसाठी अॅसिड टेस्ट ठरली होती. गोवा ती टेस्ट पास झाला आहे."
गृह खात्याने देखील यात कोणताही हस्तक्षेप केला नाही त्याबाबत गृह खात्याचे आभार. असे विजय सरदेसाई म्हणाले.
शुक्रवारी रात्री वास्को पोलीस ठाण्यासमोर निदर्शेने केली. फादर बोलमॅक्स परेरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी शिवप्रेमींनी लावून धरली.
त्यानंतर रात्री उशीरा फादर परेरा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर शनिवारी बोलमॅक्स यांनी जामीनासाठी अर्ज केला. न्यायालयाकडून परेरा यांना दिलासा मिळाला आहे. परेरा यांना बाँड व हमीदाराच्या अटीशर्तीवर मडगाव सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.