Margao Garbage Problem: रहिवासी संकुलांद्वारे शेतात टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याविरुद्ध शेतकरी आक्रमक, नावेली पंचायतीकडे तक्रार

पावसाळा सुरू होण्यापूर्वी या समस्येवर तोडगा काढावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी नावेली पंचायतीकडे केली आहे.
Margao Garbage Problem
Margao Garbage ProblemDainik Gomantak
Published on
Updated on

Margao Garbage Problem: राज्यातील कचरा समस्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. सापे येथील शेतकऱ्यांनी एकमताने सापे तलावातील शेतांचे पुनरुज्जीवन करण्याचा ठराव केल्यानंतर काही दिवसांनी, शेतकऱ्यांनी परिसरातील रहिवासी संकुलांद्वारे शेतात टाकलेला इतर कचरा आणि बांधकाम कचरा याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

Margao Garbage Problem
Goa Pre-Monsoon Work: या पावसाळ्यात रस्ते होणार जलमय? सांतीनेजमधील मलनिस्सारण लाईनच्या कामाबद्दल मंत्री काब्राल म्हणतात...

शेतकऱ्यांनी लागवडीपूर्वी जमीन तयार करण्यासाठी शेतालगत असलेल्या नाल्यातील गाळ तातडीने काढण्यासाठी शेतकऱ्यांनी जलसंपदा विभागाला पत्र लिहिले आहे. प्रक्रिया न केलेले सांडपाणी शेतात सोडण्यात आल्यानंतर जवळपास तीन दशकांपासून शेततळे पडीकच आहेत.

शेतकऱ्यांनी जलसंपदा विभागाला दिलेल्या निवेदनात नाल्यात सोडण्यात येणारे प्रक्रिया न केलेले सांडपाणी ओव्हरफ्लो होऊ नये म्हणून तातडीने नाल्यातील गाळ काढण्याची विनंती केली.

त्यांनी निदर्शनास आणून दिले की, गेल्या अनेक वर्षांपासून नाला गाळाने भरला आहे, त्यामुळे नाल्याची खोली कमी झाली आहे, परिणामी सांडपाणी सुपीक भातशेतीत जात आहे.

मडगाव नगरपरिषदेच्या हद्दीत येणाऱ्या रहिवासी संकुलांद्वारे शेतात टाकण्यात आलेला कचरा साफ करण्यासाठी शेतकऱ्यांनी नावेली ग्रामपंचायतीकडेही प्रश्न उपस्थित केला असून, शेतकऱ्यांनी यापूर्वी अनेक वेळा निवेदने दिली होती परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही.

पावसाळा सुरू होण्यापूर्वी या समस्येवर तोडगा काढावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी पंचायतीकडे केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com