Cape News : योजनांच्या लाभामुळे बळीराजा सुखावला : मंत्री सुभाष फळदेसाई

Cape News : यावेळी माजी मंत्री तथा आदर्श कृषी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश शंकर वेळीप,ज्योती वेळीप,सतीश वेळीप व इतर संचालक उपस्थित होते. काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांसाठी काहीच केले नाही उलट शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आणलेली योजना बंद पाडण्याचे काम त्यांनी केले आहे असे त्यांनी सांगितले.
Cape
CapeDainik Gomantak

Cape News :

केपे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणल्या. त्या योजनांचा फायदाही शेतकऱ्यांना झाला आहे.

पूर्वी काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात शेतकरी आत्महत्या करीत होते. यासाठी सर्वांचे हित डोळ्यापुढे ठेवून मोदी कार्यरत आहेत व यासाठी त्यांचे हात बळकट करण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांनी भाजपाला साथ दिली पाहिजे, असे समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले. ते बाळ्ळी येथे आदर्श कृषी संस्थेतर्फे आयोजित शेतकऱ्यांच्या बैठकीत बोलत होते.

यावेळी माजी मंत्री तथा आदर्श कृषी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश शंकर वेळीप,ज्योती वेळीप,सतीश वेळीप व इतर संचालक उपस्थित होते. काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांसाठी काहीच केले नाही उलट शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आणलेली योजना बंद पाडण्याचे काम त्यांनी केले आहे असे त्यांनी सांगितले.

गेल्या दहा वर्ष्यात मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू केल्या यात पंतप्रधान किसान फसल बिमा,पीएम कृषी सिंचन योजना, पीएम किसान मानधन योजना,कृषी कल्याण अभियान यांचा समावेश आहे. जर शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाल्यास या योजनेचा फायदा त्यांना होतो. अशा अनेक योजना आहेत की, शेतकऱ्यांचे पैसे आता तिसऱ्या माणसांकडून न देता सरळ त्यांच्या खात्यात जमा होत असल्याने शेतकऱ्यांना फायदा होतो, असे फळदेसाई यांनी सांगितले.

केपेचे माजी आमदार तथा आदर्श कृषी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश वेळीप यांचे सहकार क्षेत्रात भरीव काम असून आज त्यांच्या एका हाकेवर एवढ्या मोठ्या संख्येने आलेले शेतकरी पाहता वेळीप यांचे कार्य दिसून येत असल्याचे फळदेसाई म्हणाले.

आज आयोजित केलेल्या या शेतकरी मेळाव्याला शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावल्याने भाजप केपे मतदारसंघातून आघाडी मिळविणार असल्याचे फळदेसाई यांनी सांगितले.

Cape
Goa Politics: राहुल गांधी तुम्हीच सांगा! विरियातोच्या संविधानाबाबत वक्तव्यवरुन विनोद तावडेंची मागणी

विरोधकांच्या प्रचाराला बळी पडू नका !

राज्य सरकारच्या शेतकऱ्यांसाठी योजना असून त्याचा लाभ कित्येक शेतकऱ्यांनी घेतला आहे. केंद्र व राज्य सरकार बाकी क्षेत्राबरोबर शेतकऱ्यांसाठी काम करीत असल्याने विरोधकांच्या प्रचाराला बळी न पल्लवी धेंपे यांना बहुमतांनी निवडून आणण्यासाठी काम केले पाहिजे, असे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com