Joaquim Fernandes: तियात्रीस्त जाजू फर्नाडीस यांचे आकस्मिक निधन

अडचणीत मदतीला धावणारा माणूस गेल्याची भावना
Joaquim fernandes
Joaquim fernandesDainik Gomantak

Joaquim fernandes Passed Away: तियात्र रंगमंचावरील प्रसिद्ध कलाकार आणि एक चांगले फुटबॉलपटू म्हणून परिचित असलेले जाजु (जुआव ज्योकी) फर्नांडीस (62) यांचे आज मंगळवारी (11 एप्रिल) सकाळी 7 च्या सुमारास हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

ते प्रसिध्द तियात्रीस्त रोजफर्न यांचे धाकटे बंधू असून काल सोमवारी हरमल येथे 'हे ओशेच चलतोले' या तियात्रात काम करून बाणावली येथे आपल्या घरी पहाटेच्या सुमारास परतले होते. आज सकाळी साडे सहाच्या सुमारास त्यांना श्र्वासोश्वास घेण्यास अडचण येऊ लागल्याने त्यांना त्वरित इस्पितळात हलविण्यात आले पण तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती.

Joaquim fernandes
Anjuna Crime: फुटबॉल सामन्यात दाखवले रेड कार्ड; रेफ्रीला दिली जीवे मारण्याची धमकी...

फर्नाडीस हे एफसी गोवाचे कर्णधार ब्रेंडन फर्नांडीस यांचे वडील असून ते स्वतः गोवा फुटबॉल संघटनेचे कार्यकारणी सदस्य होते. त्यांच्या मागे पत्नी, एक कन्या आणि तीन पूत्र असा परिवार असून त्यांचे दोन पुत्र सध्या युकेत काम करत असल्याने ते गोव्यात आल्यावर त्यांच्या अंत्यसंस्काराची तारीख ठरवली जाईल, असे सांगण्यात आले.

जाजु यांची तियात्र रंगमंचावर एक चांगले गायक आणि कलाकार म्हणून ओळख होती. आपले जेष्ठ बंधू रोजफर्न यांच्या कित्येक गाजलेल्या तियात्रात त्यांनी काम केले आहे. ते फक्त चांगले कलाकारच नव्हते तर कुणालाही अडचणीला पावणारी सहृदयी व्यक्ती होते अशी प्रतिक्रीया त्यांचे वर्गमित्र आणि गोवा तियात्र अकादमीचे अध्यक्ष मिनीन फर्नांडीस यांनी व्यक्त केली.

त्यांच्या कार्याची दखल घेऊन तियात्र अकादमीने त्यांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरव केला होता.

Joaquim fernandes
Goa Coastal Security: नौकाच नाही तर पोलिस गस्त घालणार कशी? गृह खाते आता तरी लक्ष देणार का?

दरम्यान त्यांना श्रद्धांजली वाहताना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी म्हटले आहे की, प्रख्यात तियात्र कलाकार बाब ज्योकीम जुआंव उर्फ ​​जाजू फर्नांडिस यांच्या निधनाने दु:ख झाले. खेळ-तियात्रमधील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल गोव्याच्या तियात्र अकादमीने त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले होते. फुटबॉलसाठी त्यांनी खूप मोठे योगदान दिले. त्यांचे कुटुंब आणि चाहत्यांप्रती माझ्या संवेदना. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com