Felix Dahl Death Case: 9 वर्षांपूर्वीचे स्वीडिश पर्यटक खून प्रकरण! CBI चा क्लोजर रिपोर्ट, कुटुंबीयांनी घेतला आक्षेप; वाचा संपूर्ण घटनाक्रम

Canacona Crime News: जानेवारी २०१५ मध्ये दहाल याला पाटणे, काणकोण येथे मृत्यू आला होता. काणकोण पोलिसांनी हे प्रकरण अपघाती मृत्यू म्हणून नोंद केले होते. मात्र दहालच्या नातेवाइकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतल्यावर न्यायालयाने हे खून प्रकरण म्हणून नोंद करावे, असा आदेश दिला होता.
Felix Dahl Death Case
Felix Dahl Death CaseDainik Gomantak
Published on
Updated on

Felix Dahl Murder Case Canacona

मडगाव: स्वीडिश पर्यटक फेलिक्स दहाल याच्या खून प्रकरणात कुठलेही धागे दोरे मिळत नसल्याने या प्रकरणाचा तपास बंद करण्यासाठी या प्रकरणात तपास करणाऱ्या सीबीआयने काणकोण न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल केलेला असतानाच हा तपास बंद करण्यास हरकत घेणारे एक निवेदन दाहाल याच्या कुटुंबीयांनी न्यायालयात सादर केले आहे.

जानेवारी २०१५ मध्ये दहाल याला पाटणे, काणकोण येथे मृत्यू आला होता. काणकोण पोलिसांनी हे प्रकरण अपघाती मृत्यू म्हणून नोंद केले होते. मात्र दहालच्या नातेवाइकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतल्यावर न्यायालयाने हे खून प्रकरण म्हणून नोंद करावे, असा आदेश दिला होता. मात्र काणकोण पोलिसांना हा तपास करणे अशक्य झाल्याने हे प्रकरण सीबीआयकडे देण्यात आले होते.

सीबीआयच्या केस बंद अर्जाला हरकत घेणारे निवेदन ॲड. शिखा भुरा यांनी काणकोण न्यायालयात सादर केले आहे. सीबीआयने या प्रकरणाचा तपास करताना पोस्टमॉर्टम अहवालात जे निष्कर्ष काढले आहेत त्याकडे संपूर्णतः दुर्लक्ष केले असे म्हटले आहे.

२०१५ गोव्यात न्यू इयर साजरे करण्यास आलेल्या दहाल याचा मृतदेह पाटणे येथील रस्त्यावर सापडला होता. दारूच्या किंवा अन्य कुठल्याही नशेत रस्त्यावर कोसळून त्याच्या डोक्याला मार बसून त्याचा मृत्यू झाल्याचा निष्कर्ष काणकोण पोलिसांनी त्यावेळी काढला होता. मात्र शवचिकित्सा अहवालात त्याच्या डोक्याची कवटी पाच ठिकाणी फुटून त्यातून मेंदूत रक्तस्राव झाल्याने निधन झाल्याचे स्पष्टपणे नमूद केले होते. त्यामुळेच ६ जुलै २०१८ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका निकाली काढताना हे प्रकरण खून म्हणून नोंदवावे असा आदेश दिला होता. सीबीआयने न्यायालयाच्या या निष्कर्षाकडेही दुर्लक्ष केल्याचे या आक्षेप निवेदनात म्हटले आहे.

हा तपास सीबीआयने स्वतःच्या हाती घेतल्यावर दहाल याला मृत्यू कसा आला असावा याचा तर्क करण्यासाठी ''घटना पुनर्निर्माण'' पद्धतीचा वापर केला होता. ज्यात मृताच्या वजनाचा पुतळा वापरून तो रस्त्यावर कसा पडला असावा याची चाचणी करून घेतली होती. मात्र ही चाचणी घेताना दहाल याचा मृतदेह कुठल्या अवस्थेत होता ते अचूकरीत्या लक्षात घेतले गेले नाही याकडे लक्ष वेधून न्यायालयाने तपास अधिकारणीच्या लक्षात या साऱ्या बाबी आणून द्याव्यात अशी मागणी त्याच्या कुटुंबीयांनी केली आहे.

Felix Dahl Death Case
Bicholim Crime: पतीचे अनैतिक संबंध की कंपनीतील चोरीचं प्रकरण? डिचोलीतील विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी वाढले गूढ

तपासाबाबत कुटुंबीयांकडून शंका

सीबीआयच्या एकूणच तपासावर शंका घेताना कुटुबीयांनी सीबीआयने या प्रकरणाचा तपास आपल्या भ्रष्टाचार विभागातील अधिकाऱ्याकडून का करून घेतला असा सवाल उपस्थित केला आहे. खून प्रकरणाचा तपास करणाऱ्या पथकाकडून तो का केला गेला नाही, असाही सवाल उपस्थित केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com