Handicraft: तबला, डग्गा तयार करून देणारे पंढरपूरचे कुटुंब

40 वर्षांपासून सेवा : गणेशचतुर्थी पूर्वी दोन महिने पवार कुटुंबीयांचे पेडणे येथे वास्तव्य
Handicraft
HandicraftDainik Gomantak
Published on
Updated on

पारंपरिक कलेचे जतन करणाऱ्या कलाकारांना सरकारने मानधन द्यावे की न द्यावे, हा सरकारचा अधिकार आहे. परंतु ही कला तसेच कलाकारही जगला पाहिजे. गेली ४० वर्षे गणेश चतुर्थी पूर्वी दोन महिनेअगोदर पेडणे शहरात येऊन तबला व डग्गा तयार करून देण्याचे काम करतो, असे योगेश पवार यांनी सांगितले.

Handicraft
Goa Shipyard गोवा शिपयार्ड बांधणार चार जहाजे

पवार हे मूळचे पंढरपूरचे, परंतु मागची ४० वर्षे ते कुटुंबाला घेऊन गोव्यात येतात व पेडणे येथे तबला व डग्गा तयार करून देण्याचे काम करतात. त्यांची पत्नी व दोन्ही मुलेही त्यांना मदत करतात. पवार कुटुंबीय मागची ४० वर्षे ही सेवा देते, परंतु सरकारच्या कोणत्याच योजनेचा लाभ त्यांना मिळत नाही. तशी कोणती आशाही न बाळगता आपली पारंपरिक कला टिकवून ठेवण्यासाठी हे कुटुंब धडपडत आहे.

योगेश पवार सांगतात की, ४० वर्षांपूर्वी आपण आपल्या वडिलांसोबत पेडणे शहरात तबला व डग्गा तयार करण्यासाठी पहिल्यांदा आलो होतो. त्यानंतर दरवर्षी येत राहिलो. त्यामुळे अनेकांशी ओळख झाली व ग्राहकही वाढले. आम्ही केवळ चतुर्थीच्या काळात पेडणेत येतो.

दोन महिने राहतो. किती फायदा वा किती तोटा, याचा विचार करत नाही. आवश्‍यक साहित्य सोलापूर येथून आणतो. तबला व डग्गा तयार करणे, त्यावर साई चढविणे ही एक कला आहे. त्यासाठी ताल व सूर कळावे लागतात. वडिलांकडून आपण हे सगळे शिकलो, असे ते सांगतात.

पत्नी, मुलांची मदत

योगेश पवार यांची पत्नी तबल्याला शाही घालण्याचे काम करते. घरकाम करत असताना आपल्या पतीला शक्य ती मदत करतात. योगेश यांची मुलगी सहावीत आणि मुलगा आठवीत सोलापूर भागात शिकतो.

Handicraft
Mopa International Airport: ब्ल्यू कॅप प्रीपेड टॅक्सी संघटनेची स्थापन...

वडिलांना मदत व्हावी तसेच या कलेचे धडे घ्यावे यासाठी शाळेची परवानगी घेऊन ही मुले आई वडिलांबरोबर येतात व त्यांना मदत करतात. मात्र आपला अभ्यास ती ऑनलाइन पद्धतीने पूर्ण करतात. शाळेत चांगल्या गुणांनी ही दोन्ही मुले उत्तीर्ण होतात हे विशेष होय, असे त्यांचे आई वडील सांगतात.

50 जोडे तबला, डग्गा विक्री

दरवर्षी साधारण 50 जोडे तबला व डग्गा आम्ही पेडणेत विकतो. तसेच अनेक ग्राहक तबला डग्गा दुरुस्तीसाठीही घेऊन येतात. काहीजण तबल्यासाठी शाही घालण्यासाठी येतात. ही सगळी कामे आम्ही मनोभावे करतो, असे योगेश पवार म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com