Kala Academy: 'भाजपच्या पतनाला सुरुवात, 4 जूनला सरकार कोसळणार'; कला अकादमीवरुन आलेमाव आक्रमक

Yuri Alemao On Kala Academy: कला अकादमीची फॉल्स सिलिंग कोसळणे हा भाजपच्या गोटात आलेल्या भूकंपाचा पुरावा आहे.
Yuri Alemao On Kala Academy
Yuri Alemao On Kala AcademyDainik Gomantak

Yuri Alemao On Kala Academy

काँग्रेसने 21 वचनांचा गोवा केंद्रित जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर, भाजपला भूकंपाचे हादरे बसले. कला अकादमीची फॉल्स सिलिंग कोसळणे हा भाजपच्या गोटात आलेल्या भूकंपाचा पुरावा आहे. 19 एप्रिलला भाजपच्या पतनाला सुरुवात झाली आहे आणि 4 जून 2024 ला अहंकारी राजवट कोसळेल असा टोला विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी हाणला.

नुकत्याच नूतनीकरण केलेल्या गोवा कला अकादमीमध्ये फॉल्स सिलिंग कोसळल्याच्या आणखी एका घटनेवर प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचारासह निकृष्ट दर्जाची कामे हे भाजपच्या विकसित भारताचे मॉडेल आहे अशा शब्दात भाजपला फटकारले.

या निवडणुकीच्या काळात निसर्ग आता भाजपचा भ्रष्टाचार उघड करत आहे. दोन दिवसांपूर्वी 1500 कोटींहून अधिक खर्च केलेल्या स्मार्ट सिटी पणजीला पूर आला होता. अटल सेतूवरील खड्ड्यांमुळे भाजपच्या राजवटीत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला हे स्पष्ट झाले होते असे युरी आलेमाव यांनी नमूद केले.

Yuri Alemao On Kala Academy
Goa Murder Case: अल्पवयीन मुलगी, वृद्ध महिला आणि दोन परप्रांतीय कामगार; गोव्यात 10 दिवसांत चार खून

गोव्याची ओळख, पर्यावरण आणि नैसर्गिक सौंदर्य नष्ट करून भाजपने तथाकथीत विकास साधला. त्यांचा "विकसीत भारत" हा भाजपला करोडोंचा निधी देणाऱ्या क्रॉनी कॅपिटलिस्टचा विकास आहे, असा आरोप युरी आलेमाव यांनी केला आहे.

सुमारे 75 कोटी खर्च करून केलेल्या कला अकादमीच्या नूतनीकरणाच्या कामाची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत उच्चस्तरीय चौकशीची मागणी आम्ही केली होती. भाजप सरकारमध्ये सदर चौकशीला सामोरे जाण्याची हिंमत नाही, असे युरी आलेमाव म्हणाले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तात्काळ उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अधिपत्याखाली चौकशी आयोग स्थापन करून कालबद्ध चौकशीचे आदेश द्यावेत, अशी माझी मागणी आहे, असे युरी आलेमाव म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com