Bicholim News: डिचोलीत १३ ठिकाणी पडझडीने लाखोंचे नुकसान

Tree Collapses In Bicholim: वादळी पावसाच्या तडाख्यामुळे आज डिचोलीत विविध भागात झाडांची पडझड झाली
Tree Collapses In Bicholim: वादळी पावसाच्या तडाख्यामुळे आज डिचोलीत विविध भागात झाडांची पडझड झाली
Tree Collapse Bicholim Dainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: वादळी पावसाच्या तडाख्यामुळे आज डिचोलीत विविध भागात झाडांची पडझड झाली. दिवसभरात सहा घरांवर मिळून तेरा ठिकाणी झाडे कोसळली. या पडझडीत जीवितहानी नसली, तरी लाखोंच्या मालमत्तेचे नुकसान झाले.

साखळी येथे ‘श्रेया गार्डन’या आस्थापनावर पिंपळाचे झाड कोसळले. कुडणे येथे कॅनरा बँकेजवळ एका घरावर तर वरचे हरवळे येथे एका घरावर माड कोसळला. कोठीवाडा-कारापूर येथे दोन ठिकाणी दोन घरांवर तर भटवाडी-उसप येथे एका घरावर झाड पडले. यात घरांची मोठी हानी झाली.

आयडीसी,जोगीवाडा-डिचोली तसेच अडवलपाल, लाखेरे-वन, भटवाडी-नानोडा धुमासे तसेच डिचोली अग्निशमन दलाच्या कार्यक्षेत्रात होंडा येथे रस्त्यावर झाड कोसळले. घरांसह वीज खात्याचे मिळून ३ लाखांचे नुकसान झाले. अग्निशमनचे अधिकारी राहुल देसाई यांच्यासह उपअधिकारी शिवाजी नाईक, साईनाथ केसरकर, उदय मांद्रेकर, प्रल्हाद देसाई यांच्या नेतृत्वाखाली जवान मदतकार्यात होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com