Goa Mankurad Mango Price : राज्यात ‘मानकुराद’च्या दरात घसरण

उकाडा वाढल्याने नागरिक विविध शीतपेयांचा आधार घेत आहेत
Mankurad Mango in Panjim Market
Mankurad Mango in Panjim MarketDainik Gomantak
Published on
Updated on

बाजारात मोठ्या प्रमाणात आंबे दाखल होऊ लागल्याने मानकुरादसह इतर आंब्यांच्या दरात घट झाली आहे. आंब्यांची आवक वाढल्याने दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

पणजी बाजारात मध्यम आकाराचा मानकुराद दीड हजार ते बाराशे रुपये प्रति डझन दराने विकला जात होता. हापूस हजार ते आठशे रुपये दराने विकला जात असून महिन्याभरापूर्वी 5 हजार रुपये प्रतिडझन दराने मानकुराद विकला जात होता.

Mankurad Mango in Panjim Market
Mango : 42 जातींचे जतन, अनेक जाती नष्ट; कृषी विज्ञान संस्थेचा उपक्रम

मानकुराद आंब्यासोबतच हापूस, पायरी, शेंदुरी, शाबेर अशा विविध प्रकारचे आंबे बाजारात दाखल झाले असून हजार आठशे दरम्यान प्रतिडझन दराने विकले जात आहे.

राज्यात मोठ्या प्रमाणात उकाडा वाढल्याने नागरिक विविध शीतपेयांचा आधार घेत आहेत. त्यातही लिंबू पाणी, लिंबू सरबत, लिंबू सोड्याचे सेवन अधिक प्रमाणात होत असल्याने लिंबूना मागणी वाढली आहे.

मागणी एवढा पुरवठा होत नसल्याने जो लिंबू 2 रुपयांना एक मिळत होता त्याच लिंबाला आत्ता 5 ते 7 रुपये नागरिकांना मोजावे लागत आहेत. बाजारात पिकलेले फणस दाखल झाले असून 50 रुपये प्रती वाटा दराने फणसाचे गरे विकले जात आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com