आमदारकी सोडणे हा तर त्यांचा रिटायरमेंट प्लान; दिनेश राव यांची फालेरोंवर खोचक टीका

लुईझीन फालेरो यांनी कॉंग्रेसची आमदारकी सोडणे हा त्यांचा रिटायरमेंट प्लान आहे. कारण कॉंग्रेस सोडण्याची नेमकी कारणे ते विषद करु शकले नाहीत
 पत्रकार परिषदेत बोलताना कॉंग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश राव. सोबत दिगंबर कामत, गिरीश चोडणकर, आल्तीन गोम्स व इतर नेते
पत्रकार परिषदेत बोलताना कॉंग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश राव. सोबत दिगंबर कामत, गिरीश चोडणकर, आल्तीन गोम्स व इतर नेतेDainik Gomantak

पणजी: लुईझीन फालेरो (Luizinho Faleiro) यांनी कॉंग्रेसची (Congress) आमदारकी सोडणे हा त्यांचा रिटायरमेंट (Retirement) प्लान आहे. कॉंग्रेस सोडण्याची नेमकी कारणे ते विषद करु शकले नाहीत. ते सध्या संभ्रमात आहेत. त्यांना निवडणूक समितीचे अध्यक्षपद देऊनही त्यांनी कॉंग्रेस सोडण्याची नेमकी कारणे गोवेकरांना सांगावीत.असे प्रतिपादन कॉंग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश राव (Dinesh Rao) यांनी आज केले.

 पत्रकार परिषदेत बोलताना कॉंग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश राव. सोबत दिगंबर कामत, गिरीश चोडणकर, आल्तीन गोम्स व इतर नेते
अतिथी देवो भव् तत्वानुसार  सरकार पर्यटकांचे हीतरक्षण करणार 'मुख्यमंत्री डॉ. सावंत'

लुईझीन फालोरो यांनी कॉंग्रेस पक्षाचा व आमदारकीचा राजीनामा दिल्याच्या पार्श्‍वभुमीवर पणजी येथील कॉंग्रेस मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत राव बोलत होते. यावेळी विरोधीपक्षनेते दिगंबर कामत, प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर, उपाध्यक्ष आल्तीन गोम्स, युवा कॉंग्रेसचे अध्यक्ष ॲड. वरद म्हार्दोळकर, दक्षिण गोवा अध्यक्ष जो डायस आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 पत्रकार परिषदेत बोलताना कॉंग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश राव. सोबत दिगंबर कामत, गिरीश चोडणकर, आल्तीन गोम्स व इतर नेते
आगरवाडा चोपडे पंचायतीच्या सरपंच पदी भगीरथ पंढरीनाथ गावकर यांची बिनविरोध निवड

काहीच फरक पडणार नाही

राज्यात कॉंग्रेस मजबूत स्थितीत आहे. लोकांना गोव्यात कॉंग्रेसची सत्ता हवी आहे. कितीही पक्ष गोव्यात आले तरी कॉंग्रेसवर त्याचा परिणाम होणार नाही. फालेरो यांना कॉंग्रेसने दोनवेळा मुख्यमंत्री केले. केंद्रीय स्तरावर पक्षात महत्वाचे पद दिले. सध्या गोव्यात त्यांची गरज होती. मात्र त्यांनी कॉंग्रेस सोडली. व गोवेकरांना धोका दिलाय. लोक त्यांना माफ करणार नाहीत. त्यांनी रिटायरमेंट प्लान केलाय. गिरीश चोडणकर ( प्रदेश अध्यक्ष)

युवा नेते पक्षासोबतच

फालेरो यांनी कॉंग्रेस पक्ष सोडला तरी सर्वच्या सर्व युवा नेते पक्षासोबतच आहेत. एकाही आंदोलनात फालेरो सहभागी नव्हते. ॲड. वरद म्‍हर्दोळकर (युवा अध्यक्ष)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com