Fake Excise Commissioner: चक्क अर्ध्या दिवसाचा अबकारी आयुक्त बनला तोतया! कर्मचाऱ्यांनीच केला भांडाफोड; गुन्हा दाखल

Fake Excise Commissioner Goa: अबकारी खात्याला गुरुवारी नवा आयुक्त मिळाला. मात्र, कर्मचाऱ्यांना यामुळे झालेला आनंद क्षणभंगूर ठरला आणि आयुक्त बनून आलेली ती व्यक्ती तोतया असल्याचे सिद्ध झाले.
Fake Excise Commissioner Goa
Fake Excise CommissionerDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: अबकारी खात्याला गुरुवारी नवा आयुक्त मिळाला. मात्र, कर्मचाऱ्यांना यामुळे झालेला आनंद क्षणभंगूर ठरला आणि आयुक्त बनून आलेली ती व्यक्ती तोतया असल्याचे सिद्ध झाले.

आल्तिनो येथे असलेल्या अबकारी खात्याच्या मुख्यालयात सध्या आयुक्तपद रिक्त आहे. याआधी आयएएस अधिकारी आश्विन चंद्रू यांच्याकडे या पदाचा ताबा होता. त्यांची अरुणाचल प्रदेशात बदली झाली आहे. आज एक व्यक्ती कार्यालयात आली आणि तिने कर्मचाऱ्यांना सांगितले, की मुख्यमंत्री कार्यालयातून आयुक्तपदाचा ताबा माझ्याकडे सोपवला आहे.

Fake Excise Commissioner Goa
FC Goa ISL Squad: एफसी गोवाचा 'आयएसएल' संघ जाहीर; शनिवारी चेन्नईयीन एफसीविरुद्ध पहिली लढत

कर्मचारी काही सगळ्याच सनदी अधिकाऱ्यांना ओळखत नसल्याने त्यांनी आयुक्तपदाच्या केबिनकडे त्या व्‍यक्तीला नेले. त्या व्यक्तीने पदाचा ताबा घेतला. त्याने येताना बहीण व वडिलांनाही सोबत आणले होते. ती बाब कर्मचाऱ्यांपैकी काहींना खटकली. कारण असे पूर्वी कधीच झाले नव्हते. त्या व्यक्तीने सादर केलेल्या आदेशात चंद्रू यांनी आपण आयुक्त, अतिरिक्त आयुक्त व संचालक (प्रशासन) या पदांचा ताबा मनोज अनिल तळेकर यांच्याकडे २९ सप्टेंबरपासून सोपवत असल्याचे म्हटले होते.

प्रत्यक्षात असा ताबा देण्याची सरकारमध्ये पद्धत नाही. अधिकाऱ्याकडे अतिरिक्त ताबा देण्याचा आदेश कार्मिक विभागाचे अवर सचिव जारी करतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा संशय आणखीन बळावला. त्यापैकी काहींनी थेट कार्मिक विभागाशी संपर्क साधून या नावाच्या अधिकाऱ्याकडे आयुक्तपदाचा ताबा दिला आहे का, याची विचारणा केली.

कार्मिक खात्याकडून असा कोणताही आदेश दिलेला नाही आणि त्या नावाची व्यक्ती सरकारी अधिकारी नाही, असे स्पष्ट झाल्यानंतर हळूच पोलिसांना कळविण्यात आले आणि त्या तोतया अधिकाऱ्याची वरात पणजी पोलिसांत निघाली. सायंकाळी उशिरापर्यंत त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात येत होता, असे उपविभागीय पोलिस अधिकारी सुदेश नाईक यांनी सांगितले.

Fake Excise Commissioner Goa
Goa Fish Market: म्हापसा मासळी मार्केटला मुख्यमंत्र्यांची अचानक भेट; विक्रेत्यांच्या समस्यांवर आठवडाभरात उपायांचे निर्देश

म्हणे, पदासाठी २७ लाख मोजले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तळेकर याने सांगितले, की त्याने या पदासाठी २७ लाख रुपये मोजले आहेत. अजित शंखवाळकर याने तो आदेश पैशांच्या बदल्यात दिल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार पोलिस शंखवाळकर याचा शोध घेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com