Panaji News : अपयश अनेक गोष्टी नव्याने शिकवते : डॉ. श्रीधर सोमनाथ

Panaji News : ते दोनापावल येथे आयोजित मनोहर पर्रीकर विचार महोत्सवात प्रमुख वक्ते या नात्याने बोलत होते.
S. Somanath Chairmen of  the ISRO
S. Somanath Chairmen of the ISRODainik Gomantak
Published on
Updated on

Panaji News : पणजी, ‘चांद्रयान-२’ प्रक्षेपणात आलेल्या अपयशातून आम्ही अनेक गोष्टी नव्याने शिकलो. ‘चांद्रयान-२’च्या अपयशाची कोणती कारणे होती यावर विचारमंथन करून त्या चुका पुन्हा होणार नाहीत याकडे लक्ष दिले. ‘चांद्रयान ३’च्या प्रक्रियेसाठी चार वर्षांचा कालावधी लागला.

ज्यावेळी यश मिळते त्यावेळी आपल्याला आनंद मिळतो; परंतु ज्यावेळी अपयश येते त्यावेळी ते अनेक गोष्टी नव्याने शिकवते, असे इस्त्रोचे प्रमुख डॉ. श्रीधर सोमनाथ यांनी सांगितले. ते दोनापावल येथे आयोजित मनोहर पर्रीकर विचार महोत्सवात प्रमुख वक्ते या नात्याने बोलत होते.

डॉ. सोमनाथ म्हणाले, ‘चांद्रयान-३’मध्ये ‘चांद्रयान-२’च्या तुलनेत अधिक सुधारणा करण्यात आल्या होत्या. विक्रम लॅंडर अधिक भक्कम केला होता. अधिक इंधन, सोलार पॅनल, सेन्सर, कॅमेरा तसेच इतर बाबी अधिक होत्या.

भारताने ५० हून अधिक उपग्रह अंतराळात पाठविले आहेत. त्याचा फायदा आपल्या दैनंदिन जीवनात होतो. हवामान, संवाद, संरक्षण तसेच इतर क्षेत्रात ते महत्त्वाचे योगदान देत असतात. संवाद क्षेत्रातील एटीएम, डीटीएच, आर्थिक व्यवहार या उपग्रहांमुळे शक्य होतात.

S. Somanath Chairmen of  the ISRO
Dance Bar In Goa: कळंगुटमधील बेकायदेशीर डान्सबार तातडीने बंद करा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com