Goa Bank Fraud Case: सायबर गुन्ह्यांत कमालीची वाढ! कंपनीचा संचालक असल्याचे भासवून तब्‍बल 41 लाखांना गंडा

सायबर ब्रँचकडे तक्रार नोंद
Bank Fraud Case
Bank Fraud CaseDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Bank Fraud Case: आपण कंपनीचा संचालक असून अमुक रक्‍कम बँकेत ट्रान्‍सफर कर असे सांगून एका ठगाने दक्षिण गोव्यातील एका कंपनीला 41 लाखांचा गंडा घालण्याचा प्रकार घडला. या प्रकरणी सायबर ब्रँचकडे तक्रार नोंद करण्यात आली आहे.

Bank Fraud Case
Vijay Sardesai Meets Nitin Gadkari: वेस्टर्न बायपास स्टिल्टसह 'या' विषयांवर विजय सरदेसाईंनी घेतली गडकरींची भेट

मिळालेल्‍या माहितीनुसार, त्या ठगाने कंपनीच्या एका कर्मचाऱ्याला फोन करून ही रक्कम वळती केली. आपल्याला संचालकाने दिलेला हा आदेश समजून दक्षिण गोव्‍यातील त्या कंपनीच्‍या अधिकाऱ्याने सुमारे 41 लाखांची रक्‍कम ट्रान्‍सफर केली.

खात्री करण्‍यासाठी म्‍हणून त्‍या अधिकाऱ्याने पुन्‍हा त्‍या संचालकाशी संपर्क साधण्‍याचा प्रयत्‍न केला आणि संपर्क झालाही. मात्र आपण बैठकीत व्‍यस्‍त असल्‍यामुळे पुन्‍हा पुन्‍हा फोन करू नये आणि त्‍वरित रक्‍कम पाठवावी अशी सूचना त्‍याने केली होती.

दरम्यान, अशीच एक घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. एका कंपनीचा संचालक असल्याचे सांगून अज्ञाताने पंजाब नॅशनल बँकेला 16.42 लाखांना गंडा घातला. याप्रकरणी बँकेने सायबर गुन्हे कक्षाकडे दाखल केलेल्या तक्रारीनुसार अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com