Catholic Wedding: कॅथलिक समाजासाठी विवाहाची वेळ रात्री 12 पर्यंत वाढवावी; चर्चिल आलेमाव यांची मागणी

Catholic Wedding: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलून वेळ वाढवून घ्यावी असे आलेमाव म्हणाले.
Catholic Wedding| Churchill Alemao
Catholic Wedding| Churchill AlemaoDainik Gomantak

Catholic Wedding

कॅथलिक विवाहाची वेळ रात्री 12 पर्यंत वाढवावी, अशी मागणी माजी आमदार माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव यांनी केली आहे. लग्नाला सध्या असलेली 10 पर्यंत परवानगी पुरेशी नसल्याची मागणी आलेमाव यांनी केली आहे. याबाबत त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे समस्या उपस्थित करावी असेही आलेमाव म्हणाले.

चर्चिल आलेमाव यांनी पत्रकार परिषदेत याबाबत मागणी केली. कॅथलिक विवाहासाठी आता मिळणारी वेळ पुरेशी नसून, त्याला १२ पर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी त्यांनी केली.

गोव्यात हिंदू, मुस्लिम आणि कॅथलिक समाज मोठ्या प्रमाणावर आहेत. हिंदूंमध्ये एकदा लग्न लागले, जेवण केले कि शुभेच्छा देऊन घरी जातात. मुस्लिम लोकांमध्ये देखील लग्नानंतर बिर्याणी खाऊन लोक घरी जातात.

कॅथलिकांमध्ये परंपरा थोडी वेगळी आहे. लग्नानंतर बुक केलेल्या हॉलमध्ये सर्वजण जमतात, जल्लोष साजरा करता. डान्स, पेय वैगरे घेतली जातात. त्यामुळे थोडा अधिक वेळ जातो.

Catholic Wedding| Churchill Alemao
Cashew Fest Goa 2024: हुर्राक, फेणी, काजूचे पदार्थ, लाईव्ह म्युझिक आणि बरेच काही; शुक्रवारपासून गोव्यात काजू महोत्सव

सर्व गोष्टी पार पडण्यासाठी किमान पाच ते सहा तास लागतात. त्यामुळे वेळ वाढवावी असे, आलेमाव म्हणाले. रात्री बारा पर्यंत वेळ वाढविण्याची मागणी त्यांनी केली. किमान साडे अकरापर्यंत तरी वाढ करावी असे आलेमाव यांनी सुचविले.

राज्यात नुकत्याचा पार पडलेल्या लोकसभा मतदानाबाबत प्रश्न विचारला असता, लोक ज्याला पाठिंबा देतील तो उमेदवार निवडून येईल असे आलेमाव म्हणाले. लोकांना जो उमेदवार योग्य वाटतो त्याला मतदार मतदान करतात असे त्यांनी सांगितले.

मला अनुभव असला तरी कोण निवडून येईल याबाबत भविष्यवाणी करता येणार नाही, असे आलेमाव म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com