Goa University: दोन्ही संघटनांनी केला विजयाचा दावा; 29 सप्टेंबरला चित्र होईल स्पष्ट

टुगेदर फॉर युनिव्हर्सिटी विद्यार्थी संघटनेचे पारडे जड असल्याचे दिसून येत आहे
Goa University Student Body Election
Goa University Student Body ElectionDainik Gomantak

Goa University Student Body Election: गोवा विद्यापीठातील गटप्रतिनिधींची निवडणूक गुरुवारी (ता.१४) पार पडली. एकूण २६ उमेदवारांपैकी ११ उमेदवार बिनविरोध तर उर्वरित निवडणुकीद्वारे जिंकून आले असून टुगेदर फॉर युनिव्हर्सिटी विद्यार्थी संघटना आपले १८ व इतर २ मिळून एकूण २० उमेदवार जिंकल्याचा दावा करत आहेत तर एनएसयूआय गोवादेखील आपले एकूण १३ उमेदवार जिंकल्याचा दावा करत आहेत.

दोन्ही संघटना आपल्या विजयाचा दावा करत असून नेमके कुणाकडे मताधिक्य आहे, हे २९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या अंतिम निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट होणार आहे. मात्र, टुगेदर फॉर युनिव्हर्सिटी विद्यार्थी संघटनेचे पारडे जड असल्याचे दिसून येत आहे.

Goa University Student Body Election
Renewable Energy: ‘अक्षय ऊर्जा’साठी सल्लागार नेमणार; सरकारची निविदा

निवडून आलेल्या उमेदवारांची नावे

सिया गावस, अंभिषा प्रभू, कुलदीप घोरपडे, किरण पार्सेकर, शरण सावळ, किरण नाईक, साई नाईक, रुद्राक्ष नाईक, गणराज गावस, यज्ञेश वझरकर, सतेज खांडेपारकर, अमेय गावस, सुभाष पाडलोस्कर, प्रणिता खाणोळकर, सुधांशू नायक, आरोन आंद्रादे, दिव्या केरकर, निलय देसाई, सुफिया मुल्ला, भाग्यश्री नाईक, रूषांक नाईक, आशुतोष प्रभू, शौनक भांडिये, चेतन भगारिया, रॉक्सेथ सिक्वेरा, जेन परेरा.

"मी सर्वप्रथम आम्हाला बहुमताने निवडून दिल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानतो. मागील सलग सात वर्षे आमचे पॅनल जिंकत आले आहे. विद्यापीठात अचानक निवडणुका रद्द केल्यानंतर पुन्हा निवडणूक घेण्यात आली. त्यातही आमच्याच पॅनलला मोठ्या संख्येने निवडून दिले. आमच्या संघटनेद्वारे विद्यार्थी मंडळ स्थापन केले जाईल."

- साहील गाड, अध्यक्ष, विद्यार्थी मंडळ गोवा विद्यापीठ

"आमचे एकूण १३ प्रतिनिधी निवडून आले असून इतर काही विद्यार्थी प्रतिनिधी आमच्या गटात सहभागी होणार आहेत. २९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत आमचेच मताधिक्य असेल."

- नौशाद चौधरी, अध्यक्ष, एनएसयूआय गोवा विद्यापीठ

Goa University Student Body Election
सात दिवसांत परिस्थिती सुधारा, FDA गोवाकडून प्रसिद्ध युएस औषध कंपनीला परवाना निलंबित करण्याचा इशारा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com