...म्हणून तिसऱ्यांदा फातोर्ड्यातून विजयी झालो; विजय सरदेसाई

विजय सरदेसाई यांची खास मुलाखत
 विजय सरदेसाई
विजय सरदेसाईDainik Gomatak
Published on
Updated on

गोवा: विधानसभा निवडणुकीकडे नेहमीच आपण एक आव्हान म्हणून पहातो आणि त्यादृष्टीने निवडणुकीची पूर्वतयारी करतो. योग्य नियोजन व जनतेच्या प्रश्न सोडविण्यासाठी घेतलेले कष्ट यामुळेच आपण तिसऱ्यांदा फातोर्ड्यातून विजयी झालो आहे, असे गोवा फारवर्डचे (Goa Forward) सर्वेसर्वा तसेच फातोड्या’चे उमेदवार विजय सरदेसाई (Vijay Sardesai) यांनी सांगितले.

 विजय सरदेसाई
Goa BJP: भाजप नेत्यांनी पराभूत उमेदवारांशी साधला संवाद

यावेळी आपल्यासमोर कोणते मुद्दे होते?

यावेळची निवडणूक (Goa Assembly Election) अगदीच वेगळ्या स्वरुपाची होती. लोकांसमोरील मुद्देही वेगळे होते. पण, आपणाला काहीच फरक पडला नाही. कारण तेथील मतदाराकडील संपर्क आपण कधीच तुटू दिला नाही की वेळोवेळी त्यांच्यासाठी तत्पर राहिलो. प्रश्र्न कोणत्याही स्वरुपाचे असोत सरकार दरबारी वा आपल्या पातळीवर ते दूर केले व त्यामुळे विजय सरदेसाई व फातोर्डा हे समीकरणच झाले आहे.

मतदारसंघातील जनतेचा प्रतिसाद कसा होता?

विविध माध्यमातून आपण लोकांच्या संपर्कात सतत राहिलो असल्याने प्रचारासाठी म्हणून वेगळे काही करण्याची गरज भासली नाही. पण, निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच आपण आपल्या सहकाऱ्यांसह मतदारसंघातील प्रत्येक घरांना भेट दिली. त्यामुळे काही समस्या नव्याने दिसून आल्या त्या दूर करण्याचे प्रयत्न केले. आपल्या पक्षाची कॉंग्रेसकडील युती साकारण्यास काहीसा विलंब झालेला असला तरी फातोर्डाबाबत प्रश्र्न नसल्याने आपण प्रचार सुरूच ठेवला होता. त्या कामात फातोर्डातील नगरसेवकांची मोठी मदत झाली, असे सरदेसाई म्हणाले.

यंदाच्या निवडणुकीत कोणत्या क्लृप्त्या वापरल्या?

या काळात प्रतिस्पर्ध्यांनी विविध क्लृप्त्या लढविल्या; पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. कारण गेल्या पाच वर्षात व त्यापूर्वीच्या कार्यकाळात फातोर्डात झालेला कायापालट मतदारांसमोर होता. त्यामुळे आपणाला वेगळा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याची गरजच भासली नाही. उलट विरोधी गटाकडून होणाऱ्या आरोपांमुळे प्रचाराला मदतच झाली.

‘आरजी’च्या मतांची चिंता वाटते का?

उत्तर: फातोर्डासारख्या भागात रिव्होल्यूशनरी गोवन्सला मिळालेली मते ही चिंतेची बाब आहे. बहुतेक कुणीच या पक्षाला गांभीर्याने घेतले नव्हते. पण, त्यांचे उमेदवार असलेल्या बहुतेक ठिकाणी त्या पक्षाने मते मिळविलेली आहेत व म्हणून भविष्यात त्याला दुर्लक्षून चालणार नाही, असे सरदेसाई म्हणाले.

प्रमोद प्रभुगावकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com