ABHA CARD : येत्या तीन महिन्यांत सर्वांना आभा कार्ड : आरोग्य सचिव

जी 20 परिषदेच्या पार्श्चभूमीवर साधनसुविधांची पाहणी
Abha Health Card
Abha Health Card Dainik Gomantak

राज्यातील सर्व नागरिकांना येत्या जूनपर्यंत ‘आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट’ (आभा कार्ड) पुरविण्यात येईल, अशी माहिती आरोग्य सचिव अरुण कुमार मिश्रा यांनी दिली.

राज्यात होत असलेल्या जी 20 परिषदेच्या निमित्ताने उभारलेल्या आरोग्य विषयक साधन सुविधांची पाहणी आणि केंद्रीय योजनांची अंमलबजावणी यासंबंधीची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

यावेळी जी20 विशेष आरोग्य अधिकारी डॉ. केदार रायकर, आरोग्य सेवा संचालिका डॉ. गीता काकोडकर उपस्थित होते.

मिश्रा म्हणाले, आम्ही 25 टक्के आभा कार्ड बनवले असून 100 टक्के नोंदणीसाठी प्रयत्नशील आहोत. आभा मोबाईल एप्लिकेशनमुळे प्राथमिक आरोग्य केंद्रामधील वैद्यकीय सुविधा सहजपणे उपलब्ध होण्यास चालना मिळाली आहे. तंत्रज्ञानाचा वापर करता न येणाऱ्या रुग्णांनाही या सेवेचा लाभ कशा प्रकारे देता येईल, याबाबत आम्ही अभ्यास करत आहोत.

Abha Health Card
Manoj Bajpayee : "तू चांगला दिसत नाहीस !" मनोज वाजपेयीला टॉपची हिरॉईन बोलली, नंतर यश चोप्रांनीही पुन्हा संधी नाही दिली...

पिळये उत्कृष्ट प्राथमिक आरोग्य केंद्र

पिळये प्राथमिक आरोग्य केंद्रात आपत्कालीन आरोग्य सेवा, आयुर्वेदिक ओपीडी, नेत्रसमस्या ओपीडी, दंतसमस्या ओपीडी, महिला आरोग्य, बालरोग उपचार, निरंतर उपलब्ध असलेली रुग्णवाहिका सेवा, स्टेमी-कार्डियाक रुग्णांवर उपचार, डायालिसिस युनिट, रोग प्रतिबंधात्मक उपचार सेवा, कोविड-19 चाचणी, प्रयोगशालेय निदान सेवा, औषधालय, एक्स-रे सेवा, अल्ट्रासोनोग्राफी सेवा, होमिओपॅथी उपचार सेवा, कान-नाक-घसा (ईएनटी) सेवा, ज्येष्ठ नागरिक आरोग्य उपचार सेवा आदी आरोग्य सेवा उपलब्ध केल्या जातात.

या केंद्रामध्ये रुग्णांवर डायालिसिस उपचार केले जातात, अशी माहिती डॉ. संदेश मडकईकर यांनी दिली.

आठ बैठकांचे आयोजन

जी20 परिषदेच्या आठ बैठकांचे आयोजन गोव्यात होणार आहे. दोन मंत्रिगट आणि सहा इतर बैठकी असतील. त्यातील पहिली बैठक बांबोळी-गोवा येथील ग्रँड हयातमध्ये 17 ते 19 एप्रिलद रम्यान होणार आहे. या दुसऱ्या आरोग्य सेवा कार्यगटाच्या बैठकीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील आरोग्य अधिकारी व प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com