मडकई मतदारसंघ स्वच्छ सुंदर ठेवण्यासाठी प्रत्येकाने हातभार लावावा; सुदिन ढवळीकरांचे आवाहन

मंत्री सुदिन ढवळीकर; ढवळीत ‘एसटीपी’ कनेक्शन सुरू
Sudin Dhavalikar
Sudin DhavalikarDainik Gomantak
Published on
Updated on

मडकई मतदारसंघ स्वच्छ सुंदर ठेवण्यासाठी प्रत्येकाने हातभारा लावावा, असे आवाहन करताना मलनिस्सारण जोडणी घेऊन या स्वच्छतेत भर घालावी आणि आपला परिसर सुंदर ठेवावा असे या मतदारसंघाचे आमदार तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले. ढवळी येथे मलनिस्सारण जोडणीचे उद्‍घाटन केल्यानंतर वीजमंत्री सुदिन ढवळीकर बोलत होते.

Sudin Dhavalikar
Goa Police : पोलीस खात्यात मोठे फेरबदल; 369 कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश

यावेळी व्यासपीठावर सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल, जिल्हा पंचायत सदस्य गणपत नाईक, सरपंच मनुजा नाईक, उपसरपंच सुशांत कपिलेश्‍वरकर तसेच इतर पंचसदस्य, माजी सरपंच राजेश कवळेकर, आयव्हीबीडी विद्यालय संस्थेचे कुमार सरज्योतिषी, जयंत मिरिंगकर, मलनिस्सारणच्या ‘एसआयडीसीजीएल’चे व्यवस्थापकीय संचालक अमर वझरानी, कार्यकारी अभियंता प्रदीप गावडे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आयव्हीबीडी विद्यालयाच्या स्वच्छतागृहाचे कनेक्शन मलनिस्सारण प्रकल्पाला देण्यात आले. सुदिन ढवळीकर यांनी मंत्री नीलेश काब्राल यांचे अभिनंदन करताना सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विविध कामांप्रती काब्राल यांचे नेहमीच सहकार्य लाभते, असे त्यांनी सांगितले. मलनिस्सारण प्रकल्पाबरोबरच कचरा प्रकल्पही कार्यन्वित करून मडकई मतदारसंघ स्वच्छ सुंदर ठेवण्याची ग्वाही सुदिन ढवळीकर यांनी दिली.

नीलेश काब्राल म्हणाले की, सुदिन ढवळीकर यांच्याकडून मडकई मतदारसंघातील विविध विकासकामांचा तगादा लागलेला असतो. मतदारांना चांगले ते देण्याचा नेहमीच ढवळीकर यांनी प्रयत्न केला असून अशा राजकारणी मंडळींचे मार्गदर्शन लाभत असल्यामुळे विकासकामे पूर्ण होण्यास मदतच होते.

मलनिस्सारण जोडणी घेण्यासाठी पंचायत मंडळाने प्रयत्न करावेच, पण विद्यार्थिवर्गानेही याबाबत आवश्‍यक जनजागृती करणे गरजेचे असल्याचे काब्राल यांनी सांगितले. स्वागत व प्रास्ताविक कुमार सरज्योतिषी यांनी केले. सूत्रसंचालन तानाजी गावडे यांनी तर प्रदीप गावडे यांनी आभार मानले.

येत्या 23 रोजी प्लांटचे उद्‍घाटन!

कवळे येथील एसटीपी प्लांटचे उद्‍घाटन येत्या 23 रोजी होणार आहे. मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्प उभारणीचे काम पूर्ण झाले असून आता त्याचे लोकार्पण केले जाणार असून गाव आणि शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखावी असे आवाहन दोन्ही मंत्र्यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com