Mauvin Godinho: पंचायतींना केली जाणार सौर ऊर्जा निर्मितीची सक्ती

Borim Panchayat Solar Grid: बोरी ग्रामपंचायत सभागृहात पंचायतीसाठी बसवलेल्या १५ केडबल्यू सोलर ग्रीडच्या उद्‍घाटन समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून मंत्री माविन गुदिन्हो बोलत होते
Borim Panchayat Solar Grid: बोरी ग्रामपंचायत सभागृहात पंचायतीसाठी बसवलेल्या १५ केडबल्यू सोलर ग्रीडच्या उद्‍घाटन समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून मंत्री माविन गुदिन्हो बोलत होते
Borim Panchayat Solar Grid, Mauvin GodinhoDainik Gomantak
Published on
Updated on

राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत सौर पॅनल बसवून वीजनिर्मिती करण्यासाठी सक्ती केली जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक पंचायतीसाठी वीज निर्मिती करण्याची चांगली सोय केली जाणार आहे. या योजनेसाठी राज्य आणि केंद्र शासनाकडून मदत व प्रोत्साहन दिले जाणार आहे, असे प्रतिपादन पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी केले.

बोरी ग्रामपंचायत सभागृहात पंचायतीसाठी बसवलेल्या १५ केडबल्यू सोलर ग्रीडच्या उद्‍घाटन समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून मंत्री माविन गुदिन्हो बोलत होते.

याप्रसंगी जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर व जिल्हा पंचायत सदस्य दीपक नाईक बोरकर, बोरीचे सरपंच सतीश नाईक, उपसरपंच रश्‍मी नाईक, पंचायत सदस्य सागर नाईक बोरकर, संगीता गावडे, दुमिंग वाज, जयेश नाईक, भावना नाईक, किरण नाईक, सुनील बोरकर, विनय बोरकर, दत्तेश नाईक, गटविकास अधिकारी अश्‍विन देसाई, प्रसिध्द नाईक, दीक्षा नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना सहकार मंत्री सुभाष शिरोडकर म्हणाले की, बोरी पंचायतीने सोलर वीज निर्मिती करून वापरण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत स्तुत्य असा आहे. यामुळे वीज बील भरण्याचा भुर्दंड पडणार नाही. पैशाची बचत होईल. इतर पंचायतीनेही ही योजना राखण्याचे आवाहन त्यांनी केले.

नागरिकांनीही योजना आपल्या घरी राबवण्याचे आवाहन शिरोडकर यांनी केले. पाहुण्यांच्या हस्ते पारंपारिक दीपप्रज्वलन करून व नामफलकाचे अनावरण करून या उपक्रमाचे उद्‍घाटन करण्यात आले. सरपंच सतीश नाईक यांंनी स्वागत केले. मनुराय नाईक यांनी सूत्रसंचालन केले. पंचसदस्य दुमिंग वाज यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com