मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतरही शिवोलीच्या रस्त्यावर खड्डेच खड्डे: आगरवाडेकर

स्थानिक युवक प्रणीत शिवोली नागरिक समितीचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते विद्याधर आगरवाडेकर (Vidyadhar Agarwadekar) यांनी सांगितले.
Vidyadhar Agarwadekar
Vidyadhar AgarwadekarDainik Gomantak
Published on
Updated on

शिवोली: 2017 साली शिवोलीत (Siolim) राजकीय बदल घडवून आणण्याच्या कामात शिवोली नागरीक समीतीची प्रमुख अशी भुमिका होती परंतु आज पाच वर्षानंतर गांवची स्थिती जैसे थेच असल्याचे पाहून पुन्हा एकदां शिवोलीचा राजकीय इतिहास बदलण्याची वेळ येऊंन ठेपल्याचे स्थानिक युवक प्रणीत शिवोली नागरिक समितीचे अध्यक्ष  तथा सामाजिक कार्यकर्ते विद्याधर आगरवाडेकर (Vidyadhar Agarwadekar) यांनी सांगितले. समितीच्या ओशेल-शिवोली येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना आगरवाडेकर यांनी ही माहिती दिली. यावेळी व्यासपीठावर समितीचे अशोक कोरगांवकर उपस्थित होते.

शिवोलीची सध्याची स्थिती पाहाता आपण विकासाच्या बाबतीत पंचवीस वर्षे मागे असल्याचा आभास होत असून येथील परिस्थिती बदलण्यासाठी कुणातरी विजनरी माणसाची येथे गरज जाणवत असल्याचे आगरवाडेकर यांनी सांगितले. याभागातील मासळी मार्केटात बाजारकरांसाठी साधी शौचालयाची सोय उपलब्ध नसणे ही सर्वात मोठी लाजीरवाणी गोष्ट असून खुद्द मुख्यमंत्र्यांनी घोषणा करून सुद्धा शिवोली ते म्हापसा शहराकडे जाणारा मुख रस्ता आज सुद्धा पुर्वीच्याच अवस्थेत आहे, ही राज्यातील भाजपा सरकार आणी शिवोलीचे विद्यमान आमदार विनोद पालयेंकर यांचे कदापी लपून न राहाणारे क्रुत्य असल्याचा उघड आरोप शिवोली नागरिक समितीचे अध्यक्ष विद्याधर आगरवाडेकर यांनी केला.

Vidyadhar Agarwadekar
माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय ‘सवारी’!

दरम्यान, समितीचे सचीव अशोक कोरगांवकर यांनी शिवोली समितीतर्फे कोवीड काळातही घरांघरांत गरजूंना कडधान्याचे वाटप करण्यापासून ते मास्कचे वितरण करण्याचा कार्यक्रम नियमीतपणे सुरु होता असे सांगितले इतकेच नव्हे तर गोवन्स फॉर एज्युकेशन या नॉन प्रोफिटेबल एनजीओतर्फे आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांतील विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकांचे मोफत वाटप करण्यात येत होते आणी आजही हा उपक्रम सुरुंच असल्याचे कोरगांवकर यांनी सांगितले. दरम्यान, 2017 साली शिवोलीत मोठा राजकीय बदल घडवून आणणारी शिवोली नागरिक समिती आज सुद्धा तितक्याच नेटाने योग्य उमेदवाराचा शोध घेत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, सध्या उमेदवारीवरुन चाललेला घोळ लक्षात घेतां शिवोली नागरिक समिती वेळप्रसंगी शिवोलीत स्वताचा उमेदवार उभा करण्याचाही विचार करत असल्याचे कोरगांवकर यांनी शेवटी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com