Mapusa Corporation : ‘ती’ धोकादायक इमारतीची जागा रिकामी करा! म्हापसा पालिकेचे निर्देश

Mapusa Corporation : मालक, भाडेकरूंना सात दिवसांची मुदत
Mapusa Corporation
Mapusa Corporation Dainik Gomantak
Published on
Updated on

Mapusa Corporation :

म्हापसा पोकळेवाडा, फेअरा बाईक्सा, म्हापसा येथील दुर्घटनाग्रस्त कोसकर अ‍ॅण्ड केसरकर इमारतीची जागा सात दिवसांच्या आत रिकामी करण्याचे निर्देश म्हापसा नगरपालिकेने इमारत मालक तसेच भाडेकरूंना नोटीस पाठवून दिले आहेत.

म्हापसा पालिका मुख्याधिकारी चंद्रकांत शेटकर यांनी ही इमारत रिकामी करण्याची नोटीस बजावली आहे. या नोटिशीच्या प्रती जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, नगरविकास संचालक, म्हापसा अग्निशामक दलाचे अधिकारी व म्हापसा पोलीस निरिक्षकांना पाठवल्या आहेत.

या एकमजली इमारतीचा तळमजल्यावरील काँक्रिटचा सज्जा कोसळला आहे, आणि उर्वरित इमारत जीर्णावस्थेत आहे. जी कोणत्याही क्षणी कोसळून सर्वसामान्यांच्या जीवितास आणि मालमत्तेला धोका निर्माण होऊ शकते.

Mapusa Corporation
Goa Loksabha Result 2024 : लोकसभा निकालावरून काँग्रेस नेतृत्व प्रभावहीन

तसेच अनुचित घटना घडू शकते. त्यामुळे नगरपालिका कायदा कलम १९०(१) (२) व (३) त्या अधिकारानुसार इमारतीची जागा ताबाडतोब रिकामी करावी, असे आदेश मुख्याधिकाऱ्यांनी दिला आहे.

तसेच कोणतीही अनुचित घटना घडू नये, म्हणून इमारतीच्या परिसराला बॅरिकेड करा, इमारतीच्या दुरूस्तीसाठी योग्य पावले उचला व इमारत संरचनात्मकदृष्ट्या स्थिर आहे की नाही,याचा अभियांत्रिकी महाविद्यालयमार्फत अहवाल सादर करा, असा निर्देशही मुख्याधिकाऱ्यांनी दिला आहे.

आदेश न पाळल्यास कारवाई

नोटीस मिळाल्याच्या तारखेपासून ७ दिवसांच्या आत आदेशाची कार्यवाही न झाल्यास सार्वजनिक हितासाठी आणि जीवित व मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी आवश्यक कारवाई सुरू केली जाईल, असा स्पष्ट आदेशही मुख्याधिकारी शेटकर यांनी वरील इमारत मालक आणि भाडेकरूंना दिला आहे.

दि. ७ जून रोजी सकाळी ११.३० वा. जीर्ण झालेल्या कोसकार अ‍ॅण्ड केसरकर काँक्रिटचा सज्जा कोसळून पार्क केलेल्या चार गाड्यांचे नुकसान झाले. तर एक दुकानदार किरकोळ जखमी झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com